पालघर – राज्यातील पालघर जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. याठिकाणी १ फेब्रुवारी रोजी ३५ वर्ष युवकानं वडिलांची हत्या केली आहे. या घटनेनंतर आरोपी मुलाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वडिलांकडून वारंवार पैशांची मागणी करणाऱ्या मुलाला संताप अनावर झाल्याने त्याने हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे. वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्यानं मुलानं वडिलांची हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रंजनपाडा परिसरातील ही घटना आहे. ७० वर्षीय मृत जानू माळी यांना प्रत्येक महिन्याला सरकारी योजनेतंर्गत काही रक्कम मिळते. त्यांनी ९०० रुपये काही कामानिमित्त बँकेच्या अकाऊंटमधून काढले होते. मात्र जानू माळी यांचा मुलगा रवींद्र माळी हे पैसे मागत होता. परंतु जानू यांनी पैसे देण्यापासून नकार दिला. आरोपीला पित्याने दिलेला नकार सहन झाला नाही. त्याने वडिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीमुळे जानू यांना अनेक गंभीर दुखापत झाली आहे.
मुलानं बेदम मारहाण केल्यानंतर जानू माळी यांना मोखाडा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जानू माळी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नाशिकच्या रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु रवींद्र यांनी वडिलांना नाशिकला घेऊन जाण्याऐवजी पुन्हा घरी घेऊन आला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जानू माळी यांचा मृत्यू झाला. घरच्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला. तक्रारीनुसार, आरोपी रवींद्रला अटक करुन त्याच्यावर कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला आहे. सध्या पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
झारखंडमध्येही जमिनीसाठी बापाची हत्या
झारखंडमध्ये गोड्डा येथे हैराण करणारा प्रकार समोर आला. याठिकाणी जमीन वाटपात नाराज असलेल्या मुलानं स्वत:च्या बापाचा गळा चिरला आहे. ७० वर्षीय वडिलांचा जागीच मृत्यू झाला. वडिलांनी छोट्या मुलाला जास्त जमीन दिल्याने मोठा मुलगा नाराज झाला. वारसा हक्काप्रमाणे समसमान जागावाटप करण्याची मागणी त्याने केली. ३१ डिसेंबरच्या रात्री जेव्हा सर्व लोक झोपले होते. तेव्हा मुलाने वडिलांचा गळा चिरला आणि त्यानंतर गपचूप येऊन झोपून गेला.