शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

धक्कादायक! आधी कुऱ्हाडीनं वडिलांवर घाव घातला; नंतर डिजेवर जाऊन नाचला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 12:02 PM

पोलिसांकडून मुलाला वरातीतून अटक; चौकशी सुरू

दादरी: प्रियकराच्या मदतीनं मुलीनं आईची हत्या केल्याची धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादमध्ये घडला. ही घटना ताजी असतानाच ग्रेटर नोयडातल्या कलौंदा गावात एका ज्येष्ठ नागरिकाची कुऱ्हाडीनं घाव घालून हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्या झालेल्या व्यक्तीच्या मुलाला अटक केली आहे. वरातीत डिजेवर नाचत असताना पोलिसांनी मुलाच्या मुसक्या आवळल्या. कलौंदा गावात राहणाऱ्या रामभूल यांची कौटुंबिक वादातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. दादरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा मुलगा ललितला अटक केली आहे. ललितला एक मोठा भाऊ आणि तीन बहिणी आहेत. या सगळ्यांचे विवाह झाले आहेत. ललित आणि त्याचा मोठा भाऊ अरुण या दोघांचा तीनच वर्षांपूर्वी विवाह झाला. दोघांच्या पत्नी सख्ख्या बहिणी आहेत. मात्र ललितची पत्नी गेल्या वर्षभरापासून माहेरी राहात आहे. कौटुंबिक वादामुळे रामभूल ललितच्या पत्नीला घरी येऊ देत नव्हते. पत्नीला घरी येण्याची परवानगी देत नसल्यानं रामभूल आणि ललित यांच्यात वारंवार वाद व्हायचे. शुक्रवारी रात्रीही दोघांचं भांडण झालं. या वादात अरुणनं मध्यस्थी केली. यानंतर अरुण दुसऱ्या मजल्यावर झोपायला गेला. तर रामभूल आणि ललित एकाच खोलीत झोपले. थोड्या वेळानं अरुण खाली आला. तेव्हा त्याला वडिलांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. याबद्दलची माहिती त्यानं पोलिसांनी दिली. यानंतर पोलिसांनी ललितला बछेडा गावातून अटक केली. ललित त्या गावातल्या वरातीत डीजेवर नाचत होता. 

टॅग्स :Murderखून