सोनई ऑनर किलिंग प्रकरण : सहापैकी पाच दोषी आरोपींची फाशीची शिक्षा कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 03:55 PM2019-12-02T15:55:49+5:302019-12-02T15:59:27+5:30

जानेवारी २०१३ मध्ये आंतरजातीय प्रेम प्रकरणातून तीन तरूणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

Sonai Honor Killing Case: Five out of the six convicted sentenced to death kept same by mumbai high court | सोनई ऑनर किलिंग प्रकरण : सहापैकी पाच दोषी आरोपींची फाशीची शिक्षा कायम

सोनई ऑनर किलिंग प्रकरण : सहापैकी पाच दोषी आरोपींची फाशीची शिक्षा कायम

Next
ठळक मुद्देअशोक नवगिरे या एका आरोपीची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. रमेश विश्वनाथ दरंदले (३९), प्रकाश विश्वनाथ दरंदले (३४), पोपट उर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले (४८), गणेश उर्फ प्रवीण पोपट दरंदले (१९) सर्व रा. गणेशवाडी (विठ्ठलवाडी) सोनई, तालुका नेवासा आणि संदीप माधव कुऱ्हे (३३) रा. खरवंडी, ता. नेवासा अशी या पाच आरोपींची नावे

मुंबई - अहमदनगर येथील सोनई 'ऑनर किलिंग' प्रकरणी सहापैकी पाच आरोपींची फाशीची शिक्षा मुंबई हायकोर्टाने कायम ठेवली आहे. अशोक नवगिरे या एका आरोपीची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जानेवारी २०१३ मध्ये आंतरजातीय प्रेम प्रकरणातून तीन तरूणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. रमेश विश्वनाथ दरंदले (३९), प्रकाश विश्वनाथ दरंदले (३४), पोपट उर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले (४८), गणेश उर्फ प्रवीण पोपट दरंदले (१९) सर्व रा. गणेशवाडी (विठ्ठलवाडी) सोनई, तालुका नेवासा आणि संदीप माधव कुऱ्हे (३३) रा. खरवंडी, ता. नेवासा अशी या पाच आरोपींची नावे आहेत. 

संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारे अहमदननगर जिल्ह्यातील सोनई येथील तिहेरी हत्याकांडातील दोषी सहाही आरोपींना गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात जिल्हा व सत्र न्यायाधिश आर. आर. वैष्णव यांनी फाशीची शिक्षा सुनावली होती. ‘तुमचे कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे तर आहेच, परंतु तुम्ही ज्या निर्दयतेने हे हत्याकांड घडविले ते पाहता तुम्ही सैतानही आहात, तुम्ही जिवंत राहणे हे समाजासाठी धोकादायक आहे’ अशा शब्दात न्यायालयाने निकालपत्रात ताशेरे ओढत अवघ्या दहा मिनिटांत न्यायालयाचे कामकाज स्थगित केले होते.या हत्याकांडात न्यायालयाने रमेश विश्वनाथ दरंदले (३९), प्रकाश विश्वनाथ दरंदले (३४), पोपट उर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले (४८), गणेश उर्फ प्रवीण पोपट दरंदले (१९) सर्व रा. गणेशवाडी (विठ्ठलवाडी) सोनई, तालुका नेवासा; अशोक सुधाकर नवगिरे (२८) व संदीप माधव कुऱ्हे (३३) रा. खरवंडी, ता. नेवासा यांना सोमवारी दोषी ठरविले होते. तर अशोक रोहीदास फलके रा. लांडेवाडी,सोनई यास दोषमुक्त केले होते.

सवर्ण जातीच्या मुलीशी प्रेमप्रकरण असल्याच्या संशयावरून आरोपींनी सचिन सोहनलाल घारू (२६), संदीप राजू थनवार (२४) व राहूल राजू कंडारे( २६) सर्व रा. त्रिमुर्ती कॉलेज, नेवासा फाटा या तीन तरूणांचा अतिशय निर्दयपणे १ जानेवारी २०१३ रोजी हत्या केली होती. समाजजीवन ढवळून काढणाऱ्या या हत्याकांडाचे राज्यात तीव्र पडसाद उमटून त्यावेळी सरकारही टीकेचे धनी झाले होते. त्यामुळे या हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने घटनेचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण (सीआयडी)कडे सोपविण्याबरोबरच खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात आली होती. अतिशय गाजलेल्या, जातीयवादाची परिसिमा गाठलेल्या व संवेदनशील असलेल्या या खटल्याचे अहमदनगर जिल्ह्यात पडसाद उमटण्याची शक्यता पाहून नाशिकच्या न्यायालयात हा खटला सुनावणीसाठी वर्ग करण्यात आला होता.



या खटल्याची अंतीम सुनावणी १५ जानेवारी, २०१८ येथील जिल्हा व सत्र न्यायालयात करण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजुंचे म्हणणे जाणून गुरूवार १८ जानेवारी, २०१८ रोजी निकाल देण्याचे जाहीर केले होते. गुरूवारी सकाळी खटल्याचे कामकाज सुरू झाल्यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या वकीलांना पुन्हा एकदा बाजू मांडण्याची संधी दिली त्यावेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी अर्धातास युक्तीवाद करून देशात व राज्यात जातीयवादाच्या घटना घडत असून, सदरची घटना त्याचेच द्योतक आहे. जातीयवादाचा मोठा धोका निर्माण होत असेल तर कायद्याच्या आधारेच त्यांना तुडवले गेल्यास पुन्हा तसे कृत्य करण्यास कुणी धजावणार नाही, त्यामुळे सर्व आरोपींना जास्तीत जास्त मृत्युदंडाची शिक्षा द्यावी, अशी विनंती करून सदरचे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे म्हटले होते. न्यायालयाने युक्तीवाद ऐकल्यानंतर शनिवारी निकाल देण्याचे जाहीर केले होते.

Web Title: Sonai Honor Killing Case: Five out of the six convicted sentenced to death kept same by mumbai high court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.