टिक टॉक स्टार सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणी गोवा पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. सोनाली त्याच्या पीएसोबत ज्या क्लबमध्ये गेली होती, त्या क्लबच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. या क्लबच्या बाथरुममध्ये ड्रग्ज सापडले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. सोनाली फोगाटचा पीए सुधीर सांगवान, सुखविंदर सिंह, कर्ली क्लबचा मालक आणि एक ड्रग पेडलर यांना अटक करण्यात आली आहे. सोनाली सोबत त्या क्लबमध्ये तिचा पीए, मित्र आणि आणखी दोन महिला होत्या. तसेच सोनालीची तब्येत बिघडली तेव्हा तिला क्लबमधून हॉटेलवर नेण्यात आले, तो कॅब ड्रायव्हर, तिला हॉस्पिटलला नेण्यात आले तो दुसरा कॅब ड्रायव्हर यांची चौकशी केली जाणार आहे.
मोठा ट्विस्ट! सोनाली फोगाट अन् पीए हे पती-पत्नी? गुरुग्रामच्या फ्लॅटने पेच आणखी वाढविला
कर्ली क्लबच्या मालकाला अटक करण्यापूर्वी पोलिसांनी पोस्टमार्टम रिपोर्ट आणि कुटुंबीयांच्या आरोपानंतर सुधीर आणि सुखबिंदरला अटक केली. या दोघांनी तिला बळजबरीने ड्रग्ज पाजल्याचे कबुल केले आहे. सोनालीचा मृत्यू हार्ट अॅटॅकने आल्याचे म्हटले गेले होते. यानंतर प्रकरण वाढू लागताच गोवा पोलिसांनी ड्रग थिअरी मांडली होती. पोस्टमार्टेम झाल्यानंतर पोलिसांनी सोनालीचा पीए सुधीर सांगवान आणि तिच्या मित्राला अटक केली आहे. गोवा पोलिसांनुसार सुधीरने सोनालीला जबरदस्तीने ड्रिंक पाजले होते, त्यात MDMA मिसळल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
गोवा पोलिसांचे आयजी ओमवीस सिंह यांनी पुढे सांगितले की, सोनाली फोगाट यांना जबरदस्तीने ड्रग्स पाजण्यात आले. त्यानंतर तिची प्रकृती बिघडली. पहाटे ४.३० वाजता जेव्हा ती कंट्रोलमध्ये नव्हती. तेव्हा आरोपी तिला शौचालयात घेऊन गेले. तिथे दोन तास त्यांनी काय केलं? याचं उत्तर आरोपींनी दिलेलं नाही. आम्ही सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहिले आणि दोन्ही आरोपींनी अटक करण्यात आली आहे.सोनाली फोगाट यांच्या संशयास्पद मृत्युमागे काही कटकारस्थान असल्याचा संशय पहिल्या दिवसापासूनच येत होता. सोनाली फोगाट यांचे बंधू रिंकू ढाका यांनी गोव्यातील अंजुना पोलीस ठाण्यात तशी तक्रार दिली होती. त्या तक्रारीमध्ये त्याने दोन जणांवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्याबाबतची माहिती आता पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर येत आहे. त्यामध्ये सोनाली यांच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा असल्याचे दिसून आले होते.