नालासोपारा - डॉक्टरांच्या नावाने वसई पश्चिमेकडील अंबाडी रोडवर असलेल्या सोनाराला पन्नास हजार रुपयांना शुक्रवारी रात्री गंडा घातला. याप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.वसईतील अंबाडी रोडवरील ज्वेलर्सच्या मालकाला शुक्रवारी त्यांच्या मोबाईलवर आरोपीने गोल्डन पार्क हॉस्पिटलमधील डॉ. नेहा बोलत असल्याचे सांगितले. सोन्याच्या बांगड्या बनवायच्या असून एक लाख रुपये माझ्याजवळ असल्याने ५० हजार पाठवून द्या व ५० हजार ॲडव्हान्स घेऊन ठेवा असे बोलली. दुकानमालकाने कामगाराला १ ग्रॅम सोन्याच्या डिझाईनची बांगडी आणि ५० हजार रुपये पाठविले. देवीलाल चंपालाल जाठ (२४) हा गोल्डन पार्क हॉस्पिटलच्या पायऱ्या चढत असताना चोरट्याने डॉक्टरचा मुलगा असल्याचे सांगून त्याच्याकडून ५० हजार रुपये घेतले व १ लाख रुपये घेऊन येतो सांगून पसार झाला.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. त्यामुळे शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत. कारण त्यामुळे शिक्षकांना अध्यापन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही.- अनिल शेलार, पालघर जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती संघटना