लॉकडाऊनदरम्यान बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने हजारो परप्रांतीय कामगारांना मदत करून अनेकांची मने जिंकली. आता तो एका कुटुंबास आर्थिक मदत करण्यासाठी पुढे सरसावला आहे. वास्तविक, काल रात्री जोरात वेगाने येणाऱ्या मर्सिडीज कारने दुचाकीस धडक दिल्याने एका 19 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती सोनू सूद याला समजताच त्याने मृतांच्या कुटूंबाशी संपर्क साधला आणि आर्थिक मदतीचे आश्वासन दिले. सतीश गुप्ता असं मृत दुचाकीस्वाराने नाव आहे. या प्रकरणात ओशिवरा पोलिसांनी कार चालक तैफूर तन्वीर शेख याला ताब्यात घेतले आहे, तो वय 19 वर्षांचा आहे.
ओशिवरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दयानंद बांगर म्हणाले की, अटक आरोपी तैफुर तनवीर शेख हा विद्यार्थी आहे आणि कारला ओव्हरटेक करत असताना त्यांच्या गाडीचा ताबा सुटला आणि सतीशच्या दुचाकीला जोरदार धडक त्याने दिली. पोलिसांनी शेखविरोधात भादंवि कलम२७९, ३०४ (ए) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १९६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शेखचे वडील व्यापारी असून ड्राय फ्रूट्सची निर्यात करतात. तसेच या प्रकरणात तातडीने हालचाल होण्यासाठी पोलिसांशी बोलणार असल्याचंही सोनू सूदने सांगितलं.