लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे :ठाणे पोलिस आयुक्तालयामार्फत हद्दपार असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम हाती घेतली होती. या मोहीमेला पोलिसांना यश आले असून ठाणे, कल्याण, भिवंडी, वागळे, उल्हासनगर आणि मालमत्ता गुन्हे अंतर्गत हद्दपार असलेल्या १४ आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. ही मोहीम २८ ऑक्टोबर रोजी सांयकाळी ६ ते रात्री ९ वाजेर्पयत राबविण्यात आली होती. या मोहीमेत हद्दपार असलेल्या७, फरार असलेल्या ५ आणि जुगार खेळणा:या दोन अशा तब्बल १४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या मोहीमेत गुन्हे शाखेतील १० घटक मार्फत वेगवेगळ्या ठिकाणी हद्दपार इसमांची शोध मोहीम राबविण्यात आली. या शोध मोहीम मध्ये १० पोलीस निरीक्षक, १० सहायक पोलीस निरीक्षक २० पोलीस उपनिरीक्षक सह १३५ पोलीस अंमलदारांचा यात समोवश होता. हद्दपार इसमाचा शोध मोहीम दरम्यान अभिलेखावरील पाहीजे व फरारी आरोपीत यांचा शोध घेणो, हद्दपार करण्यात आलेले आरोपीत यांना शोधन मिळून आल्यास कारवाई करणो, अवैध हत्यारे बाळगणारे व्यक्तीवर कारवाई करणो अशा प्रकारच्या सुचना देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार ठाणो, भिवडी, कल्याण-डोंबीवली, उल्हासनगर व अंबरनाथ भागात ही मोहीम राबवून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार घटक ठाणो मधून अनिल मुलघर मगरे (२०) आणि खलील फिरोज खान (२१) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच गुजराथ येथील गुन्हयातील पाहिजे असलेला गणोश उर्फ गौरव संजय भोईर (२४) यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. तर भिवंडी मध्ये बाल्या हरीशंकर सहानी (३५) याला ताब्यात घेण्यात आला आहे. निजामपुरा पोलीस स्टेशनचे दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपीत विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले आहे. कल्याण मधून विजय उर्फ बोकडया सुनिल सपकाळे (२२), उल्हासनगरमधून हद्दपार असलेला सुशिल महेद्र ठाकुर (२७), अंबरनाथ पोलीस स्टेशनचे दाखल गुन्हयातील राकेश बाबू चलवादी (२८), विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे दाखल गुन्हयातील सनाउल्ला उर्फ समीर नवीहुसेन चौधरी यास ताब्यात घेण्यात आला आहे. व जुगार कायदा कलम १२(अ) दोन आरोपींना अटक करून कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान वागळे मधून गणोश श्रीकांत लांडगे (२३), तसेच वर्तकनगर पोलीस स्टेशनचे दाखल गुन्हयातील चेतन बडू खैरे (३०), मालमता गुन्हे कक्ष हद्दपार असलेला चेतन नरेश माचरे उर्फउन्नीस उर्फ लोटस (२२) याला ताब्यात घेण्यात आला आहे. ही विशेष मोहिम अपर पोलीस आयुक्त, गुन्हे यांचे आदेशान्वये पोलीस उप आयुक्त, गुन्हे यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली व सहाय्यक पोलीस आयुक्त शोध १, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रतिबंधक तसेच गुन्हे शाखेतील सर्व घटकांचे प्रभारी अधिकारी यांचेमार्फत राबविण्यात आली आहे.