सृष्टी तुलीच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबरला आत्महत्या करण्यापूर्वी सृष्टीने आरोपी आदित्य पंडितला व्हिडीओ कॉल केल्याचं तपासात समोर आलं आहे. आत्महत्येच्या दिवशी सृष्टीचं बॉयफ्रेंड आदित्यसोबत भांडण झाल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानंतर आदित्य दिल्लीला रवाना झाला.
सृष्टी आदित्यला आणखी काही दिवस तिच्यासोबत राहण्यास सांगत होती. पण आदित्य थांबला नाही आणि दिल्लीला रवाना झाला. अशा स्थितीत सृष्टीने आदित्यला आत्महत्या करण्याची धमकी दिली. आदित्यने याकडे लक्ष दिलं नाही आणि निघून गेला. त्यानंतर सृष्टीने आदित्यला व्हिडीओ कॉल करून ती गळफास घेणार हे सांगितलं.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्यने सृष्टीसोबतच्या चॅट्स त्याच्या फोनवरून डिलीट केल्या आहेत. आदित्य काहीतरी लपवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. डिलीट केलेल्या चॅटबाबतही पोलिसांनी आदित्यची चौकशी केली. त्यानंतर आदित्यने पोलिसांना सांगितलं की, त्याने तिला सांगितलं होतं की, तिचा मृत्यू झाला तर तो आत्महत्या करेल.
सृष्टीच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्यांची मुलगी आणि आदित्य यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते, आदित्य तिला मानसिक त्रास देत होता. आदित्य सृष्टीवर आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्यासाठी दबाव टाकला होता. त्यामुळे ती नाराज झाली, कधी शाकाहारी खाण्याचे दडपण होतं, कधी शॉपिंगला जाताना वाद व्हायचा, तर कधी नॉनव्हेज खाण्यावरून अपमान व्हायचा. आदित्यला नॉनव्हेज आवडत नव्हतं आणि त्याने सृष्टीचा जाहीरपणे नॉनव्हेज खाल्ल्याबद्दल अपमान केला होता.
पोलिसांनी आदित्यचा फोन फॉरेन्सिक तज्ज्ञांकडे पाठवला असून डिलीट केलेल्या चॅट्स परत मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दोघांमध्ये सुमारे १०-११ फोन कॉल्स झाले होते. याशिवाय तिच्या फोनवर अनेक मिस्ड कॉल्स आले होते. तो सृष्टीच्या घरी परत जात होता, असा दावा आरोपी आदित्यने केला आहे. त्यावेळी त्याने सृष्टीला आत्महत्येसारखं पाऊल उचलण्यापासून रोखण्यासाठी हे सर्व कॉल केले.