अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबईपोलिसांवर बरीच टीका झाली होती. सोशल मीडियावरूनही अनेक प्रकारे अपप्रचार सुरु होता. त्या सगळ्यांवर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मोठा आरोप केला आहे. मुंबई पोलिसांची प्रतिमा मालिन करण्यासाठी मोठं षडयंत्र रचलं गेलं असून त्याच्या पाठीमागे कोण आहेत याचा पोलीस तपास करत असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांना बदनाम करण्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडू असा इशाराही त्यांनी दिला.परमबीर सिंग पुढे म्हणाले, सुशांतप्रकरणी आम्ही मुंबई पोलिसांनी केलेला सर्व तपास सर्वोच्च न्यायालयाला सादर केले होता आणि ते समाधानकारक होते. सत्य हे कायम सत्यच असते ते सगळ्यांनी लक्षात ठेवा. सोशल मीडियावर अनेक फेक अकाउंटस तयार करून त्या माध्यमातून पोलिसांची बदनामी केली गेली. त्या सर्व फेक अकाउंटसचा तपास सुरू आहे अशी माहितीही सिंग यांनी दिली.
भाजपाच्या नगरसेवकाची पोलीस ठाण्यासमोर गोळ्या घालून हत्या, सीबीआय चौकशीची मागणी
सुशांत सिंग राजपूत मृत्यू ही आत्महत्याच होती. हत्या नव्हती असा खुलासा एम्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने केल्यानंतर या सर्व प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. दरम्यान, या प्रकरणावरून सुशांत सिंग मृत्यू प्रकरणावरून शिवसेना आणि भाजपा यांच्यातील आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. घाटकोपर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार राम कदम यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देखमुख यांच्यावर ट्वीटकरून निशाणा साधला आहे. सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास वळवून ड्रग्स कनेक्शनवर आणला आणि त्यातही ड्रग्सबाबत तपासाकडे मुंबई पोलिसांनी दुर्लक्ष का केलं? मुंबई पोलिसांना काही बड्या राजकीय नेत्यांना वाचवायचं होतं का?, मुंबई पोलीस कोणाला तरी वाचवतायेत का? असा सवाल भाजपाने केला होता.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सीबीआयचा तपास मुंबई पोलिसांपेक्षा वेगळा नसेल. मुंबई पोलिसांचा तपास पूर्ण व्यावसायिक पद्धतीने करण्यात आला आहे, असा दावा मुंबईचे पोलील आयुक्त परमबीर सिंग यांनी केला. मुंबई एका वृत्तवहिनीतर्फे शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात त्यांनी सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांनी केलेला तपास व त्याबाबत झालेल्या आरोपाबाबत प्रथमच भूमिका जाहीरपणे मांडली होती.