मुंबई : वृद्धेच्या अंगावरची खरी सोनसाखळी काढून त्या जागी खोटी चेन ठेवत फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार आग्रीपाडा पोलिसांच्या हद्दीत घडला. या प्रकरणी त्यांच्या मुलीने तक्रार दिल्यावर मोलकरणीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार या नामांकित पत्रकार असून, त्या सात रस्ता परिसरात राहतात. घराची साफसफाई करायला आणि स्वयंपाक करायला दोन महिला येणाऱ्यांपैकी दीपाली (४९) आहे. २९ मार्च रोजी तक्रारदाराने आईला दीड तोळ्याची माळ घालायला दिली. सकाळी आंघोळीला जाण्यापूर्वी त्यांच्या गळ्यातील माळ कामावर येणारी अन्य महिला विमल आणि तक्रारदार यांनी पाहिली होती. आंघोळ करून आल्यावर त्यांच्या गळ्यात माळ नव्हती. शोधूनही कुठेच सापडली नाही.
हळदीच्या डब्यात ठेवली माळहळदीच्या डब्यात एक माळ सापडल्याचे दीपालीने तक्रारदारांना सांगितले. तक्रारदाराला संशय आला आणि त्यांनी मैत्रिणीच्या सोनार असलेल्या पतीला ती तपासायला सांगितले. तेव्हा ती माळ खोटी असल्याचे त्यांनी सांगितले.