शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
2
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
3
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
4
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
7
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
8
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
9
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
10
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
11
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
13
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
14
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
15
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
16
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
17
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
18
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
19
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस

अवजड वाहने चोरून बनावट कागदपत्रांद्वारे विक्री, दोघांना अटक; पावणेपाच कोटींची ५३ वाहने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2023 10:07 AM

काशीमीराच्या सिद्धिविनायक नगरमधील रोझ गार्डनमध्ये राहणारे विनयकुमार पाल यांचा टेम्पो गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये त्याच्या घरासमोरील रस्त्यावरून चोरीला गेला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : अवजड वाहने चोरून त्यांचे चेसिस व इंजिन क्रमांक खोडत बनावट कागदपत्रांद्वारे विकणाऱ्या आंतरराज्य टोळीचे २२ गुन्हे उघडकीस आणत मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखा-१ने पावणेपाच कोटींची ५३ वाहने जप्त केली आहेत. या टोळीच्या म्होरक्यासह दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात आणखी काही आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिस आयुक्त मधुकर पांडेय यांनी दिली.

काशीमीराच्या सिद्धिविनायक नगरमधील रोझ गार्डनमध्ये राहणारे विनयकुमार पाल यांचा टेम्पो गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये त्याच्या घरासमोरील रस्त्यावरून चोरीला गेला होता. काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबुरे, सहायक आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा एकचे पोलिस निरीक्षक अविराज कुराडे, सहायक निरीक्षक पुष्पराज सुर्वे, कैलास टोकले व सुहास कांबळे आणि पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी चोरीचा टेम्पो शोधण्यासाठी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील टोल नाक्यांचे सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र, गुजरात महामार्गावरील टोल नाक्यांचे सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोध घेत थेट राजस्थानच्या पाटोडी टोल नाकापर्यंत पोहोचले. त्यावेळी तिचा क्रमांक बदलून गुजरातचा झाला होता. तसेच गाडीमध्ये काहीसा बदल केला होता. मात्र, फास्टटॅग व गाडीवरील काही खुणांमुळे ती काशीमीरावरून चोरलेली गाडी असल्याचे पोलिसांनी हेरले. तेथूनच ती गाडी पुन्हा गुजरातच्या अहमदाबाद दिशेने आली. नंतर त्या फास्टटॅगचा संपर्क क्रमांक हा फारूख तय्यब खान (३६, रा. फखरुद्दीनका, पो. टपुग्रा, ता. टिजारा, जि. अलवार, राजस्थान) याचा असल्याने पोलिसांनी त्याला पकडले. सोबत त्याचा साथीदार मुबिन हारिस खान (४०) याला अटक केली.  

फारूख हा म्होरक्या असून, दोघेही आरोपी वाहनचालक आहेत. पोलिसांनी दोघांची चौकशी करण्यास सुरवात केली असता त्यांनी चोरलेली ४८ आयशर टेम्पो, २ टाटा टेम्पो, १ अशोक लेलॅण्ड टेम्पो व २ क्रेटा कार अशी तब्बल ५३  वाहने गुजरात, राजस्थान, हरयाणा भागातून जप्त केली. त्या भागातील आणखी १२ आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. 

कमी किमतीत गाड्यांची विक्रीमहाराष्ट्र, हरयाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आदी राज्यांतून वाहने चोरलेली असून,  वाहनचोरीचे २०१७ पासून २०२२ पर्यंतचे २२ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. वाहने चोरी करून त्यावरील मूळ इंजिन व चेसिस नंबर खोडून त्यावर बनावट तयार केलेल्या कागदपत्रांप्रमाणेच इंजिन व चेसिस नंबर टाकण्यात आले. त्यानंतर विविध आरटीओ विभागात पुनर्नोंदणी केल्याचे निष्पन्न झाल्याचे पाेलिस आयुक्तांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी