मुंबई -लोकलवरदगडफेकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हार्बर लाईनच्या सीएसएमटी - पनवेल मार्गावर आज अज्ञाताने दगडफेक केली आहे. मानखुर्द - वाशीरेल्वे स्थानकादरम्यान लोकलवर अज्ञाताने ही दगडफेक केली असून या दगडफेकीमुळे गार्ड जखमी झाला आहे. जखमी गार्डला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. अलीकडेच दोन ते तीन अशा प्रकारच्या घटना लोकलमध्ये घडल्या असून रेल्वे प्रशासन याकडे गंभीरतेने पाहणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणी अज्ञातांविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.
पनवेलहून सीएसएमटीकडे निघालेलेली हार्बर मार्गावरील लोकल वाशीहून निघाल्यानंतर मानखुर्द स्थानकाजवळ येताच लोकलवर दगडफेक करण्यात आली. दगड फेकण्यात आले तेव्हा लोकल वेगात असल्याने लोकलवक फेकलेले दगड शेवटच्या डब्यावर धडकले. यातील काही दगड मोटरमॅनच्या केबिनमध्येही गेले. केबिनमध्ये असलेला लोकलगार्ड या दगडफेकीत जखमी झाला. लोकलगार्डच्या डोक्याला यातील दगड लागल्याने गार्ड रक्तबंबाळ झाला.
कालच सायंकाळी 6.30 वाजता विक्रोळी पूर्वेजवळील फाटकानजीक असलेल्या कुर्ला रेल्वे पोलीस ठाणेतर्फे चालत्या लोकल आणि मेल गाड्यांवर दगडफेक करून निष्पाप लोकांना गंभीर दुखापती करून त्यांना जखमी करणाऱ्या गुन्हेगार, समाज कंटकांविरूध्द मोहिम करण्याकरिता मदतीसाठी कुर्ला रेल्वे पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच रेल्वे पोलीस व रेल्वेचे अधिकारी यांनी जनतेस मार्गदर्शन आणि जाहीर आव्हान करण्याची विशेष मोहीम देखील राबविली होती.