शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

स्पोर्टस् क्लबमधून बाथटब गेला चोरीस; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 6:54 PM

वाशीतली घटना; सुरक्षारक्षकाच्या पाहणीत प्रकार झाला उघड

ठळक मुद्दे बाथटबची पाहणी करुनच तो चोरण्यात आला असावा असाही अंदाज वर्तवला जात आहे.क्लबच्या चेंजिंग रुममधून चोरटय़ांनी हा बाथटब लंपास केला आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबई - स्पोर्टस् क्लबमधून बाथटब चोरीला गेल्याचा प्रकार वाशीत घडला आहे. क्लबच्या चेंजिंग रुममधून चोरटय़ांनी हा बाथटब लंपास केला आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरात दिवसा तसेच रात्रीच्या घरफोडीचे गुन्हे घडत आहेत. त्यामध्ये सोन्याच्या दागिन्यांसह रोकड व इतर साहित्य चोरीला जात असल्याचे दिसून येते. मात्र, वाशीत आश्चर्यजनक घटना घडली आहे. वापरात असलेला बाथटब चोरीला गेल्याचा प्रकार शहरात पहिल्यांदाच घडला आहे. वाशी येथील नवी मुंबई स्पोर्टस् क्लबच्या (एन.एम.एस.ए.) चेंजिंग रुममध्ये हा बाथटब बसवण्यात आला होता. संबंधित रुम दररोज रात्री स्पोर्ट क्लब बंद झाल्यानंतर कुलूप लावून बंद केल्या जातात. मात्र, रविवारी सकाळी सुरक्षारक्षकाच्या पाहणीत तिथल्या चेंजिंग रुमचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. यामुळे त्याने आतमध्ये जावून पाहिले असता सामान विस्कटून पडले होते. तर बाथटब त्याठिकाणी नसल्याचेही आढळून आले. यामुळे सुरक्षारक्षकाने हा प्रकार स्पोर्टस् क्लबच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आणि त्यांनी पोलीसांकडे तक्रार केली आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून ते रविवारी पहाटेच्यादरम्यान हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर बाथटबची पाहणी करुनच तो चोरण्यात आला असावा असाही अंदाज वर्तवला जात आहे. त्यानुसार वाशी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र, सुमारे पाच फुट लांबीचा आणि तीन फुट रुंदीचा हा बाथटब स्पोर्टस् क्लबमधून बाहेर नेला कसा ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचा उलगडा क्लबच्या आवारातील अथवा परिसरातील सीसीटीव्हीमधून होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी वाशी पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई