अलिबाग - मुंबई-पुणे एक्सेफ्रेस हायवेवरील खोपोली हद्दीत असलेल्या फुडमाॅल पार्कींगमधून वाहनातून २.७३२ किलोचे दागीने व सोन्याची बिस्कीटे चोरणाऱ्या आरोपीने डम्प करून ठेवलेल्या जागेवरून मिळविण्यात पोलिसांनी यश आले आहे. या प्रकरणातील आरोपी पप्पु बाबु खान मुलतानी या फरार आरोपीचा तपास पोलिस घेत आहेत.
आरोपीत यांनी एकुण १,४४,००,०००/- रूपयाचे एकुण २.७३२ किलो ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट तसेच दागीने चोरी करून नेले होते. या गुन्ह्याचा तपास लवकर व्हावा यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अधिकारी व पोलीस अंमलदार यांची दोन वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. एक पथकामार्फत अशा प्रकारचे गुन्हे करणारे बाहेर रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच बाहेरील राज्यांतील आरोपीत यांचा शोध घेणे तसेच दुसरे पथकामार्फत घटनास्थळावरील सी.सी.टी.व्ही. फुटेजची पडताळणी करण्याचे काम सुरु होते.
तपास पथकास घटनास्थळवरील सी.सी.टी.व्ही. कॅमे-यामध्ये संशईत आरोपीतांचे फोटो मिळाले होते. संशईत आरोपीतांचे फोटोंच्या सहायाने तसेच गुप्तबातमीदारा मार्फत माहीती घेत असतांना पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांना माहिती प्राप्त झाली की, अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपीत हे मध्य प्रदेश राज्यातील खैरवा, येथील आहेत. या बातमीची खातरजमा करण्यासाठी तात्काळ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, पोहवा राजेश पाटील, यशवंत झेमसे व प्रतिक सावंत असे पथक मध्यप्रदेश राज्यामध्ये रवाना झाले. या ठिकाणी जावून सीसीटीव्ही मधील फोटोच्या आधारे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा आरोपी हा पप्पू बाबू खान मुलतानी, मध्यप्रदेश येथे असल्याची खात्री झाली.
तात्काळ संशयीत आरोपी पप्पू बाबू खान याचे घरी छापा टाकला असता आरोपी तेथे नव्हता. त्याच्या घराची घरझडती घेतली असता झडतीमध्ये काही सापडले नाही. त्यानंतर आरोपीत याचा सख्खा भाऊ ईस्माईल बाबू खान, वय २७ वर्षे, याच्याकडे पप्पू बाबू खान व गुन्हयातील गेले मालाबाबत सखोल विचारपूस केली असता पप्पू बाबू खान याने त्याचे साथीदारांसह केला असल्याचे सांगून आरोपीत पप्पू बाबू खान याने त्याचेकडे ठेवण्यास दिलेली एकूण २.६८४ कि.ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्कीटे व दागिने असा मुद्देमाल समक्ष हजर केला. सदरचा मुद्देमाल दोन पंचासमक्ष पंचनाम्याव्दारे जप्त करण्यात आला आहे.