जालना/सातारा : मुलगा झाल्याचा सगळ्यात जास्त आनंद आईला किती होतो हे आजही सांगायची गरज नाही पण तो भविष्यात तोच आपला कर्दनकाळ ठरेल हे त्या माऊलीला त्यावेळी ठावूक नसते. मद्याच्या आहारी गेलेल्या पुत्रांनी मारहाण करत त्यांचा जीव घेतल्याच्या दोन घटना आज राज्यात घडल्या आहेत. रहिमतपूर (जि. सातारा) येथे मद्यपि पुत्राने आईच्या डोक्यात लोखंडी पाट्याने मारहाण केल्याने त्यात तिचा मृत्यु झाला. दुसऱ्या घटनेत लोणी (जि. जालना) येथे मद्यापि पुत्राने काठीने आईला जबर मारहाण केल्याने त्यात तिचा मृत्यु झाला. रहिमतपूर येथे शहाजी लाला पवार (३६) याने वृध्द आई सुलोचना (७०) यांच्या डोक्यात लोखंडी पाट्याने मारहाण त्यांचा खून केला व स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला.
पोलिसांनी केली आरोपीला अटकलोणी (ता. परतूर, जि. जालना) सखाराम यदाजी शिंदे (३०) या मद्यपी तरुणाला आईने दारू पिण्यास विरोध केल्याने राग अनावर झालेल्या मुलाने आईला बेदम मारहाण केली. त्यातच तिचा मृत्यू झाला.रुंदावती यदाजी शिंदे (६०) असे मयत महिलेचे नाव आहे. मंदिरात पुजारी असलेल्या यदाजी अंबाजी शिंदे (६८) आणि पत्नी रुंदावती (वय ६०) या दाम्पत्याला दोन मुले, दोन मुली आहेत. पोलिसांनी सखारामला अटक केली असून त्याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.