मुंबई - कुर्ला स्थानकादरम्यान मंगळवारी दगडफेकीच्या चार घटना घडल्या. या दगडफेकीमध्ये चार प्रवासी जखमी झाले. कुर्ला ते विद्याविहार दरम्यान तीन घटना, तर कुर्ला ते टिळकनगर या दरम्यान एक दगडफेकीची घटना घडली.कुर्ला ते विद्याविहार स्थानकादरम्यान धावत्या लोकलवर दगड भिरकविण्यात आला. यात प्रवासी राजेश पवार (१७) गंभीररीत्या जखमी झाला. राजेशच्या डाव्या डोळ्याला गंभीर इजा झाली. काही वेळेनंतर कुर्ला ते विद्याविहार दरम्यान दुसरी लोकल जात असताना त्या लोकलवर दगड फेकण्यात आला. यात प्रवासी रतनदीप चंदनशिवे जखमी झाला. त्यानंतर, याच ठिकाणी प्रवासी हरिशंकर कहार (२३) जखमी झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. हार्बर मार्गावरील कुर्ला ते टिळकनगर स्थानकादरम्यान धावत्या लोकलवर दगडफेकीमुळे तौसीफ खान (३१) जखमी झाला. दगडफेकीच्या घटना वाढल्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे.
मध्य रेल्वेच्या लोकलवर दगडफेकीचं प्रमाण वाढलं; कुर्ल्यात घडल्या चार घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 2:31 PM
कुर्ला येथे दगडफेकीच्या चार घटना
ठळक मुद्देप्रवासी राजेश पवार (१७) गंभीररीत्या जखमी झाला. हार्बर मार्गावरील कुर्ला ते टिळकनगर स्थानकादरम्यान धावत्या लोकलवर दगडफेकीमुळे तौसीफ खान (३१) जखमी झाला. कुर्ला ते विद्याविहार दरम्यान तीन घटना, तर कुर्ला ते टिळकनगर या दरम्यान एक दगडफेकीची घटना घडली.