मुंबई - लोकलमधून प्रवास करताना आज दोन विविध घटनांमध्ये दोन तरुणी जखमी झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. डोंबिवलीहून घाटकोपरकडे येत असताना वैशाली भानुशाली या तरुणीला महिला डब्यात गर्दी असल्यामुळे श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. त्यामुळे ही तरुणी गुदमरून बेशुद्ध पडली. तिला तिच्या मैत्रिणींनी घाटकोपर रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या मदतीने राजावाडी रुग्णालयात दाखल केलं. तर कांजूर आणि विक्रोळीच्या दरम्यान अज्ञात समाजकंटकांनी लोकलवर दगडफेक केल्यामुळे लोकलमधून प्रवास करत असताना समीक्षा चाळके ही महिला जखमी झाली आहे. तिला देखील घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. समीक्षा या दिव्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या जलद लोकलने प्रवास करत होत्या. या दगडफेकीत त्यांच्या पोटाला दगड लागल्याने जीआरपीने तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले.
अज्ञातांनी केली लोकलवर दगडफेक; महिला जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 7:50 PM
पोटाला दगड लागल्याने जीआरपीने तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले.
ठळक मुद्देकांजूर आणि विक्रोळीच्या दरम्यान अज्ञात समाजकंटकांनी लोकलवर दगडफेक केल्यामुळे लोकलमधून प्रवास करत असताना समीक्षा चाळके ही महिला जखमी झाली आहे. डोंबिवलीहून घाटकोपरकडे येत असताना वैशाली भानुशाली या तरुणीला महिला डब्यात गर्दी असल्यामुळे श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला.