जळगाव : तांबापुरात शनिवारी सकाळी साडे आठ वाजता सिखलकर व गवळी गटात तूफान दगडफेक झाली. त्यात सिखलकर गटाचे दोन तर गवळी गटाचा एक असे तीन जण जखमी झाले. पोलिसांनी सिखलकर गटाच्या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोलासिंग जगजितसिंग बावरी (३२), जगजितसिंग हरिसिंग बावरी (५०), समकौर जगजितसिंग बावरी (४५), सोनुसिंग जगजितसिंग बावरी २५), मोहनसिंग जगजितसिंग बावरी (सर्व रा.सिकलकरवाडा, तांबापुरा) यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आणखी काही जणांना अटक केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.मध्यरात्री घुसला महिलेच्या घरात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोला सिंग बावरी हा मद्याच्या नशेत मध्यरात्री दोन वाजता रवी हटकर यांच्या घरात घुसला होता त्यामुळे रात्री घरात एकटी असलेली महिला प्रचंड घाबरली होती.शेजारी लोकांची गर्दी झाली होती. तेव्हा भोलासिंग हा पळून गेला होता. शनिवारी सकाळी साडेआठ वाजता भोलासिंग हटकर यांच्या गल्लीतून जात असताना महिलांनी त्याला जाब विचारला असता त्याने दगडफेक करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांने देखील दगडाचा मारा केला. प्रत्युत्तर म्हणून समोरील गटानेही दगडफेक केली यात भोलासिंग बावरी जगजीतसिंग बावरी व उखा हटकर हे तीन जण जखमी झाले.
दरम्यान,घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन पोलीस निरीक्षक विनायक लोकरे,सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, अशोक संगत सचिन पाटील, योगेश बारी, लुकमान तडवी, सिद्धेश्वर दापकर, मालती वाडीले, मंदाबाई बैसाणे बीबीता राजपूत व पूनम सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत पाच जणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
पेट्रोल पंपावर दमबाजीभोलासिंग याने मध्यरात्री अडीच वाजता पांडे चौकातील पेट्रोल पंपावर तेथील कर्मचार्यांना दमबाजी केली. एका कर्मचाऱ्याने त्याला बाटलीत पेट्रोल दिले. दरम्यान, पेट्रोल दिले नाही तरी लूटमार करेल असा दम त्याने भरला होता या सर्व कर्मचाऱ्यांनी शनिवारी दुपारी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून रात्रीचा प्रकार सांगितला.
अन्य महत्वाच्या बातम्या...
हरभजनला ४ कोटींचा उद्योगपतीने घातला गंडा, पोलिसात तक्रार दाखल
बॉयफ्रेंडसोबत पत्नी हॉटेलमध्ये आक्षेपार्ह स्थितीत आढळली, पतीने चप्पलेने हाणले
दणका! रियासह इतर आरोपींचा जामीन कोर्टाने फेटाळला
सुशांतच्या फ्लॅटच्या टेरेसवर वारंवार जात होती सीबीआय आणि फॉरेन्सिक टीम
धक्कादायक! मंदिरात चोरट्यांनी घुसून तीन पुजाऱ्यांची केली निर्घृण हत्या