विचित्र घटना! बारमध्ये झालेल्या वादानंतर गुप्तांगाचा दाताने घेतला चावा
By पूनम अपराज | Published: February 8, 2021 02:06 PM2021-02-08T14:06:57+5:302021-02-08T14:08:51+5:30
Crime News : पोलिसांनी शरीफ यांना अटक केली. त्याच वेळी, सुलेमान यांना त्रिसूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले आहे.
केरळमधील एका विचित्र घटनेत एका तरूणाने एका व्यक्तीच्या गुप्तांग दाताने चावून त्याला गंभीर जखमी केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कुन्नाथूरमध्ये घडली. इथल्या बारमध्ये शरीफने रागाच्या भरात ५५ वर्षांच्या सुलेमानवर हल्ला केला आणि त्याच्या गुप्तांगास दाताने चावा घेतला.
पोलिसांनी शरीफ यांना अटक केली. त्याच वेळी, सुलेमान यांना त्रिसूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले आहे. आपत्कालीन शस्त्रक्रियेने सुलेमानचे गुप्तांग परत जोडण्यात आले. शरीफ हा पेरुम्बादप्पू येथे राहणारा आहे. तर सुलेमान हा रिहाईश पुन्नूक्कावु येथे राहणार इसम आहे. ही विचित्र घटना शनिवारी रात्री घडली. शरीफ ज्या ऑटोटॅक्सीने बारमध्ये पोहचला, त्याआधी एका पार्किंग केलेल्या कारला टॅक्सीने धडक दिली. त्यानंतर भांडणाला सुरुवात झाली. दरम्यान शरीफ खपाचं आक्रमक झाला. लोकांनी त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सर्वांवर धावून जात होता. त्याचवेळी शरीफने सुलेमानच्या गुप्तांगाचा दाताने चावा घेतला. शरीफची समजूत काढताना बार मालक आणि काही कर्मचारी जखमी झाले. शरीफाने यापूर्वी देखील दारूच्या नशेत हंगाम केला होता. पहिल्या अशाच एका घटनेत कोर्टाने त्याला खडसावाले होते.