अजबच! चोरांनी मालकाला केले बेडरूममध्ये बंद; काहीच न मिळाल्यानं जेवण करून झाले पसार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 02:47 PM2022-03-14T14:47:34+5:302022-03-14T14:49:21+5:30

Robbery Case : या घटनेनंतर एसडीएमने बंगल्यात रात्रीची सुरक्षा देण्याची मागणीही केली होती, त्यानंतर या संपूर्ण प्रकरणातील एसडीएमच्या तक्रारीवरून कुश्मी पोलीस एका अल्पवयीन मुलाला अटक करून त्याची चौकशी करत आहेत.

Strange! The thieves locked the owner in the bedroom; After getting nothing, they finished the meal | अजबच! चोरांनी मालकाला केले बेडरूममध्ये बंद; काहीच न मिळाल्यानं जेवण करून झाले पसार

अजबच! चोरांनी मालकाला केले बेडरूममध्ये बंद; काहीच न मिळाल्यानं जेवण करून झाले पसार

Next

बलरामपूर : बलरामपूर जिल्ह्यातील कुश्मी एसडीएम यांच्या बंगल्यात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी एसडीएमचा बेडरुम बाहेरून बंद करून खाण्यापिण्यावर ताव मारला आहे. या घटनेनंतर एसडीएमने बंगल्यात रात्रीची सुरक्षा देण्याची मागणीही केली होती, त्यानंतर या संपूर्ण प्रकरणातील एसडीएमच्या तक्रारीवरून कुश्मी पोलीस एका अल्पवयीन मुलाला अटक करून त्याची चौकशी करत आहेत.

वास्तविक, जिल्ह्यातील कुश्मी विकास गटाचे एसडीएम अजय किशोर  लकड़ा  यांनी सांगितले की, काल रात्री 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरातील स्वयंपाकघरातील खिडकीला लावलेला लोखंडी रॉड काढून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि घर बंद केले. माझ्या बेडरूमची कडी बाहेरून लावली. त्यानंतर चोरट्यांनी घरात ठेवलेल्या खाद्यपदार्थांवर हात साफ केला आहे. याशिवाय घरात ठेवलेल्या चालकाच्या मोटारसायकलची बॅटरीही चोरट्यांनी काढण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यातही चोरट्यांना यश आले नाही.

ड्रायव्हरने गेट उघडले
यानंतर पहाटे पाचच्या सुमारास एसडीएमला जाग आली तेव्हा बेडरूमचा दरवाजा बाहेरून बंद दिसला. त्यानंतर एसडीएमने त्यांच्या ड्रायव्हरला फोन करून बोलावले. त्यानंतर चालक घरी आला असता घरातील सामान विखुरलेले आणि एसडीएम त्यांच्या बेडरूममध्ये बंद असल्याचे त्यांनी पाहिले.

भाजप खासदाराच्या सुनेचा संशयास्पद मृत्यू, पोस्टमार्टममध्ये मोठा खुलासा

बंगल्यात सुरक्षा नाही
एसडीएम अजय किशोर यांनी सांगितले की, रात्री त्यांच्या बंगल्यात कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसते. त्यामुळे मोठी घटना घडण्याची भीती आहे. सध्या एसडीएमच्या तक्रारीवरून पोलीस एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करत आहेत. त्यानंतर पोलिसांना या प्रकरणात आणखी काही सुगावा लागण्याची शक्यता आहे.

Web Title: Strange! The thieves locked the owner in the bedroom; After getting nothing, they finished the meal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.