झाशी - उत्तर प्रदेशातील झाशी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका युवकाने त्याच्या मित्राला वर्गातच गोळी घातली आणि नंतर तो आपल्या गर्लफ्रेंडच्या घरी गेला आणि तिलाही गोळी घालून ठार केले. शुक्रवारी ही धक्कादायक घटना झाशी जिल्ह्यात घडली.
टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, मृत मुलीची ओळख २२ वर्षीय कृतिका त्रिवेदी अशी आहे. तर जखमी विद्यार्थ्याचे नाव २२ वर्षीय हुकमेंद्र सिंग गुर्जर असे आहे. मीडिया रिपोर्टनुसार, २४ वर्षीय आरोपी मंथन सिंग सेंगरने एका मुलीशी असलेल्या रिलेशनशिपवरून झालेल्या वादातून ही भयानक घटना घडवून आणल्याचा आरोप केला आहे. आरोपी आणि मृत विद्यार्थिनी हे २०१६ पासून जवळचे मित्र होते आणि मानसशास्त्रातून एमए करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, मात्र कृतिका, हुकमेंद्र आणि मंथन या तिघांच्या मैत्रीत रिलेशनशिपच्या मुद्यावर कटुता आली. मंथन याला समजले की, हुकमेंद्र कृतिकासोबतच्या त्याच्या संबंधांबद्दल अफवा पसरवत आहे. यानंतर त्याने आपल्याच मित्राला ठार मारण्याचा निर्णय घेतला.या घटनेनंतर मंथनने केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या हुकमेंद्र या विद्यार्थ्याला चांगल्या उपचारासाठी दिल्ली येथे हलविण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. आरोपी विद्यार्थी मंथनने पिस्तूल घेऊन वर्गात प्रवेश केला आणि हुकमेंद्रला डोक्याच्या मागील बाजूस गोळी घातली. त्यानंतर तो ब्लॅकबोर्डजवळ गेला आणि तेथे 'मंथन समाप्त' लिहिले. यानंतर मंथनने पुन्हा कॉलेजमध्ये गर्लफ्रेंड कृतिकाचा शोध सुरू केला. पण ती सापडला नाही. त्यानंतर आरोपी गोडू कंपाऊंडमधील कृतिकाच्या घरी गेला असता त्याने कृतिका आपल्या घरासमोर बसल्याचे पाहिले. मंथनने तातडीने मुलीवर अनेक गोळ्या झाडल्या. यानंतर, काय घडले आहे ते पाहण्यासाठी मुलीचे कुटुंबातील सदस्य आणि शेजारी गर्दी करतात. नंतर त्यांनी आरोपी मुलाला पकडून त्याला एका खांबावर बांधले. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. नंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
जुहू चौपाटीवर विकायचा भेळ; सायबर गुन्ह्यातून जमवली कोटींची माया, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
कृतिका आणि हुकमेंद्र यांना झाशी मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी नेण्यात आले, मात्र कृतिकाचा मृत्यू झाला. आरोपी मंथन हा मूळचा मध्य देशातील नेवारी जिल्ह्यातील आहे. कृतिका आणि हुकमेंद्र हे स्थानिक रहिवासी आहेत.