उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनीला ऍसिड हल्ल्याची धमकी मिळाली आहे. पीडित मुलगी अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे. विद्यार्थिनीला ही धमकी त्याच अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने दिली आहे. मोहम्मद इलियास असे आरोपी विद्यार्थ्याचे नाव असून तो अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. पोलिसांनी आरोपी विद्यार्थी मोहम्मद इलियास याला अटक केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?विद्यार्थिनीचा आरोप आहे की, तिच्या कॉलेजमधील एका विद्यार्थ्याने, मोहम्मद इलियासने तिला आधी अश्लील मेसेज पाठवले. इलियालने वाटेत अनेकवेळा विनयभंग करून तिचा छळ केला. यानंतर तो तिच्यावर जबरदस्तीने लग्न करण्यासाठी दबाव टाकू लागला. विद्यार्थिनीने विरोध केला असता इलियासने तिला अॅसिडने आंघोळ घालण्याची धमकी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद इलियास हा कानपूरच्या सिद्धार्थ नगर भागातील रहिवासी आहे. आरोपी विद्यार्थी आणि पीडित विद्यार्थिनी दोघेही अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाचे विद्यार्थी आहेत. दोघे एकाच कॉलेजमध्ये पण वेगवेगळ्या हॉस्टेलमध्ये राहतात.मोहम्मद इलियासच्या धमक्यांना घाबरलेल्या विद्यार्थिनीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सचेंडी पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवून आरोपी विद्यार्थ्याला मोहम्मद इलियासला अटक केली आहे. सीओ हृषिकेश यादव यांच्या म्हणण्यानुसार, इलियास या अभियांत्रिकी महाविद्यालयीन मुलाविरुद्ध अश्लील संदेश पाठवल्याबद्दल, विनयभंग आणि अॅसिडने आंघोळ करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आरोपीला अटक करण्यात आली आहे.