शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

वेकोलीच्या उपक्षेत्र व्यवस्थापकाला लाच घेताना अटक, सीबीआयचा ट्रॅप

By योगेश पांडे | Published: February 03, 2023 10:17 PM

गौतम बसुतकर असे संबंधित व्यवस्थापकाचे नाव आहे. संबंधित फर्मला खाणीतून ८ हजार २०० टन मेट्रीक कोळसा उचलण्याची परवानगी होती.

योगेश पांडे नागपूर : वेकोलिच्या यवतमाळमधील वणी येथील घोन्सा खाणीच्या उपक्षेत्र व्यवस्थापकाला लाच घेताना सीबीआयकडून रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. एका फर्मला डिलिव्हरी ऑर्डर देण्याच्या बदल्यात ३.२३ लाखांची लाचेची मागणी करत एक लाख रुपयांचा पहिला हफ्ता घेताना ही कारवाई करण्यात आली. सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली.

गौतम बसुतकर असे संबंधित व्यवस्थापकाचे नाव आहे. संबंधित फर्मला खाणीतून ८ हजार २०० टन मेट्रीक कोळसा उचलण्याची परवानगी होती. मात्र फर्मला ४ हजार ६२३ मेट्रीक टन कोळसाच उचलता आला. उर्वरित कोळसा उचलण्यासाठी डिलिव्हरी ऑर्डर देण्याची संबंधित फर्मने विनंती केली. मात्र बसुतकरने परवानगी नाकारली व लाचेची मागणी केली. अगोदर केलेली मदत व २ हजार ५०० मेट्रीक टन कोळसा उचलण्याच्या डिलिव्हरी ऑर्डरच्या बदल्यात व्यवस्थापकाने रकमेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित फर्मच्या अधिकाऱ्यांनी सीबीआयकडे तक्रार केली. सीबीआयने तक्रारीची शहानिशा केली व सापळा रचला. एक लाखांच्या पहिल्या हफ्त्याचे पैसे घेताना बसुतकरला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याशिवाय त्याचे कार्यालय व निवासस्थानाचीदेखील झडती घेण्यात आली.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीCBIगुन्हा अन्वेषण विभाग