हिंगणघाट( वर्धा) - येथील जळीतकांड प्रकरणात उलटतपासणीचे कामकाज बुधवारी पूर्ण झाले. या प्रकरणाच्या मुख्य तपास अधिकारी तृप्ती जाधव यांची बचाव पक्षाकडून उलट तपासणीकरिता अँड भुपेन्द्र सोने यांनी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात बुधवारी सकाळी ११ वाजता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.एन.माजगावकर यांच्या समोर उलट तपासणीच्या कामकाजाची सुरुवात केली.
न्यायालयाची वेळ ही कोविड प्रादुर्भावाचे कारणाने १:०० वाजेपावेतो असताना या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता न्यायाधीश यांनी अर्धा तास उशिरापर्यंत कामकाज समोर नेले. याप्रकरणातील सरकारी विधीतज्ञ उज्वल निकम हे कोरोनाचे संकटामुळे प्रत्यक्ष न्यायालय हजर राहू शकले नाही मात्र सकाळी ११ वाजेपासून कामकाज संपेपर्यन्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे त्यांनीं सहभाग नोंदविला, उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांची उलट तपासणीचे जबाणी पूर्ण झाल्यामुळे. सरकारी पक्षातर्फे साक्षदार तपासणीचे कामकाज संपविण्यात आले. न्यायालयाने या प्रकरणातील आरोपीच्या बयानाकरीता उद्या २० मे तारीख ठेवण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांच्या उलट तपासणीत अस्पष्टता असल्यामुळे त्याचा खुलासा करण्याकरीता व काही बाबी न्यायालयासमोर याव्यात यासाठी अँड. उज्वल निकम यांनी फेरतपासणी अर्ज केला असता त्या अर्जावर बचाव पक्षाचे व शासनाचे विधीतज्ञ यांचे म्हणणे न्यायालयाने ऐकून तो अर्ज नामंजूर केला. या प्रकरणामध्ये स्थानिक जिल्हा न्यायालयाचे सरकारी वकील अॅड.दीपक वैद्य हे सहभागी होते.