Crime News : हरयाणाच्या फरीदाबादमधून लाचखोरीची एक अजब घटना समोर आली आहे. इथे एका म्हैस चोरीच्या केसमध्ये कारवाई करण्याच्या बदल्यात पीडित व्यक्तीकडे सब इन्स्पेक्टरने लाच मागितली. पण त्याला व्हिजिलेंज विभागाने 4 हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं. हैराण करणारी बाब म्हणजे रंगेहाथ पकडल्यानंतर सब इन्स्पेक्टरने व्हिजिलेंस टीमसमोरच ते पैसे गिळण्याचा प्रयत्न केला. सोबतच त्यांना धक्का-बुक्कीही केली.
दरम्यान तिथे असलेल्या एका व्यक्तीचने या घटनेचा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. मिळालेल्या माहितीनुसार, सेक्टर - 2 मध्ये तैनात सब इन्स्पेक्टर महेंद्र पाल विरोधात व्हिजिलेंस टीमला तक्रार मिळाली होती. त्यांना माहिती मिळाली की, म्हैस चोरीच्या केसमध्ये कारवाई करण्याच्या बदल्यात पीडित व्यक्तीकडे लाच मागितली गेली आहे. व्हिजिलेंट टीम लगेच तिथे पोहोचली आणि सब इन्स्पेक्टरला 4 हजरा रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं.
तक्रारदार शंभू नाथने सांगितलं की, त्याच्या घरातून रविवारी रात्री उशीरा म्हैस चोरी केली होती. सोमवारी शंभूनाथ तक्रार देण्यासाठी सेक्टर-3 च्या पोलीस स्टेशनमध्ये गेला. तिथे असलेल्या सब इन्स्पेक्टर पाल याने कारवाई करण्याच्या बदल्यात त्याच्याकडे 15 हजार रूपयांची लाच मागितली.दोघांमध्ये 10 हजार रूपयांची बोलणी झाली. ज्यानंतर शंभूनाथने आधी 4 हजार रूपये या सब इन्स्पेक्टरला दिले. नंतर 2 हजार रूपये दिले. शंभू इन्स्पेक्टरला म्हणाला की, आता त्याच्याकडे आणखी पैसे नाहीत. पण सब इन्स्पेक्टरने शंभूकडे आणखी 4 हजार रूपयांची मागणी केली. याला वैतागून पीडित हरयाणा राज्य चौकशी ब्यूरोला याची माहिती दिली.
प्लानिंग करून शंभू नाथ 4 हजार रूपये घेऊन तिथे पोहोचला जिथे त्याला सब इन्स्पेक्टरने बोलवलं होतं. जसेही शंभू नाथने इन्स्पेक्टरला 4 हजार रूपये दिले, व्हिजिलेंस टीमने त्याला पकडलं. टीम बघताच सब इन्स्पेक्टरने पैसे गिळण्याचा प्रयत्न केला. नंतर व्हिजिलेंस टीमसोबत धक्का-बुक्कीही केली. पण टीमने त्याला अटक केली. पुढील कारवाई सुरू आहे.