शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

नायब तहसीलदारांचा पाणबुडी विद्युत पंप लांबविला

By सूरज पाचपिंडे  | Published: May 13, 2023 7:26 PM

शेजारील दोन शेतकऱ्यांच्या वायरचीही चोरी

धाराशिव : अज्ञात व्यक्तीने शहरातील निवृत्त नायब तहसीलदारांच्या शेतातील पाणबुडी विद्युत पंप व शेजारील दोन शेतकऱ्यांच्या शेतातील वायर चोरून नेले. ही घटना १२ मे रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी १३ मे रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील तांबरी विभाग भागात राहणारे निवृत्त नायब तहसीलदार सुभाष पवार यांची शहरातील आठवडी बाजाराच्या पूर्वेस शेतजमीन आहे. त्यांनी शेतीपिकांना पाणी देण्यासाठी विहिरीत पाणबुडी विद्युत पंप व केबल वायर बसविले होते. १२ मे रोजी विहिरीत विद्युत पंप नसल्याची माहिती भागीण रमेश चव्हाण यांनी पवार यांना दिली. त्यांनी शेतात जाऊन पाहणी केली असता, विहिरीतील १५ हजार किमतीचा पाणबुडी पंप व १०० मीटर केबल वायर नसल्याचे आढळून आले. त्यांनी शेजारील शेतकरी अर्जुन पवार व बालाजी डुमणे यांना विचारणा केली असता, त्या दोघांनीही स्वत:च्या शेतातील १०० मीटर वायर चोरीस गेल्याचे सांगितले. याप्रकरणी सुभाष पवार यांनी १३ मे रोजी शहर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी