बापरे! फोनवर तरुणांशी बोलल्याची इतकी जीवघेणी शिक्षा; कुटुंबीयांनी केलेली बेदम मारहाण व्हिडिओत कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 08:55 PM2021-07-04T20:55:11+5:302021-07-04T20:55:51+5:30

Crime News : एवढेच नाही तर तेथील लोकांनी या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला पण कोणीही त्यांना वाचविण्याची तसदी घेतली नाही.

Such a life sentence for talking to young people on the phone; Captured in the video of the brutal beating by the family | बापरे! फोनवर तरुणांशी बोलल्याची इतकी जीवघेणी शिक्षा; कुटुंबीयांनी केलेली बेदम मारहाण व्हिडिओत कैद

बापरे! फोनवर तरुणांशी बोलल्याची इतकी जीवघेणी शिक्षा; कुटुंबीयांनी केलेली बेदम मारहाण व्हिडिओत कैद

Next
ठळक मुद्देव्हिडिओमध्ये केवळ तरुणांनीच नव्हे तर महिलांनीही लाठीने मारहाण केली. मुलींना दगड आणि लाथा - बुक्यांनी देखील मारहाण केली. व्हिडिओ काही दिवस जुना असल्याचे सांगितले जात आहे.

मध्य प्रदेशच्या अलिराजपूरमध्ये धरणी जिल्ह्यातील  टांडा  पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या  पीपलवा  गावचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असल्याचे मुलींशी झालेल्या गैरवर्तन आणि मारहाणीचा विषय मिटलेला नाही. व्हिडिओमध्ये दोन मुलींना बेदम मारहाण करण्यात आली होती. व्हिडिओमध्ये असे दिसून येत आहे की काही लोक दोन अल्पवयीन मुलींना लाठीकाठीने जबर मारहाण करीत आहेत. मुलींना मारहाण करणारे जनावरांपेक्षा वाईट वागताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण करणारे लोक हे संबंधातील मुलींचे चुलत चुलत भाऊ आहेत. घरातील सदस्यांनी मुलींसोबत मारहाणीचे गैर कृत्य केले आहे. एवढेच नाही तर तेथील लोकांनी या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला पण कोणीही त्यांना वाचविण्याची तसदी घेतली नाही.

व्हिडिओ पाहून, हे स्पष्ट आहे की, कोणाच्याही मनात कायद्याची भीती नाही. प्रत्येकजण कायदा हातात घेण्याकडे झुकला आहे. व्हिडिओमध्ये, मुली ओरडत राहिल्या परंतु मारहाण करणाऱ्या लोकांच्या मानला कायद्याची भीती नाही. मुली त्यांच्याकडे दया - याचना करत राहिल्या, पण त्यांना सतत काठीने मारहाण करण्यात आली. व्हिडिओमध्ये केवळ तरुणांनीच नव्हे तर महिलांनीही लाठीने मारहाण केली. मुलींना दगड आणि लाथा - बुक्यांनी देखील मारहाण केली. व्हिडिओ काही दिवस जुना असल्याचे सांगितले जात आहे.

मानहानीला बळी ठरलेल्या, दोन्ही मुली चुलत असून दोघांचेही लग्न अलीराजपूरच्या जोबटमध्ये झाले आहे. मुलींनी असा आरोप केला आहे की, उपस्थित लोकांनी त्यांना शाळेजवळ थांबवले आणि मामाच्या कुटूंबाच्या दोन मुलांबरोबर फोनवर का बोलतात हे त्यांना विचारले. यानंतर, फक्त फोनवर बोलल्याबद्दल मुलींना बेदम मारहाण केली. दोन्ही मुली इतक्या भयभीत झाल्या की त्यांनी तक्रार नोंदविली नाही.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात दखल घेतली असल्याचे  टांडा चे पोलिस स्टेशन प्रभारी विजय वासकळे यांनी सांगितले. घटनास्थळी भेट दिल्यानंतर मुलींना पोलिस ठाण्यात आणले. येथे चौकशी केली असता मुलींनी सांगितले की, त्यांच्या नातेवाईकांनीच त्यांना मारहाण केली. तक्रारीवरून पोलिसांनी कुटुंबातील ७ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आणि सर्वांना अटक केली.

Web Title: Such a life sentence for talking to young people on the phone; Captured in the video of the brutal beating by the family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.