पुणे - बेकायदा बांधकामाची महापालिकेत तक्रार केल्याच्या रागातून पती-पत्नीला मारहाण करणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांना दोन वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिक्षा झालेले आरोपी हे पती-पत्नी आणि दोन मुले आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांनी हा निकाल दिला.आरोपींमध्ये पिंपरी-चिंचवडमधील एका शाळेत मुख्याध्यापिका असलेल्या महिलेचा समावेश आहे. युवराज विष्णू रणदिवे (वय ५०), माया युवराज रणदिवे (४५), मयूर युवराज रणदिवे (२३) आणि मंदार युवराज रणदिवे (१९ सर्व रा. शिवाई कॉलनी, जाधवनगर, येरवडा) या चौघांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.याप्रकरणी जीवन भीमसेन वाघमारे यांनी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. २४ नोव्हेंबर २०१० रोजी ही घटना घडली. फिर्यादी हे त्यांच्या कुटूंबासह शिपाई कॉलनी जाधवनगर येथे राहतात. त्यांच्या वस्तीत राहणारा युवराज रणदिवे याने फिर्यादीच्या घराच्या वर अनधिकृत घर बांधले. आरोपींच्या घरातील पाणी फिर्यादीच्या घरात गळत असल्यामुळे त्यांनी वारंवार आरोपींना समजावून सांगितले होते. त्याबाबत फिर्यादींनी महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे अर्ज केला होता.
मारहाण : पती-पत्नी, दोन मुलांना सक्तमजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 2:16 AM