मुंबई - चिट फंड चालवणाऱ्या स्मिता श्रीवास्तव (३२) नामक महिलेला फसवणुकीच्या गुन्ह्यात दहिसर पोलिसांकडुन अटक करण्यात आली होती. या महिलेने पोलीस ठाण्याच्या स्वच्छतागृहात जाऊन फिनाईल पीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या जाचाला कंटाळून तिने हा प्रकार केल्याचा आरोप तिच्या पतीने केला आहे.स्मिताला सध्या जे. जे. रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी उशिरा रात्री हा प्रकार घडला. मात्र पोलिसांनी गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास त्यांना ही माहिती दिल्याचे स्मिताच्या पतीचे म्हणणे आहे. स्मिताला महिला पोलिसांकडून मारहाण करण्यात आली होती. त्याला कंटाळुन तिने हे पाऊल उचलल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. ह्यअनेक महिलाकडुन चिटफंडच्या नावाखाली पैसे उकळून फसवणुक केल्याप्रकरणी तिला दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर दुपारी चौकशी दरम्यान तिने स्वच्छतागृहात जाऊन फिनाईल प्यायल्याचे नाटक केले आणि धावत येऊन याबाबत पोलिसांना सांगितले.
महिला आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; दहिसर पोलीस ठाण्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 1:51 PM
महिलेने पोलीस ठाण्याच्या स्वच्छतागृहात जाऊन फिनाईल पीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
ठळक मुद्देस्मिताला सध्या जे. जे. रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहेदोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर दुपारी चौकशी दरम्यान तिने स्वच्छतागृहात जाऊन फिनाईल प्यायल्याचे नाटक केले आणि धावत येऊन याबाबत पोलिसांना सांगितले.