उत्तर वझिरिस्तान जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या ताफ्यावर आत्मघाती बॉम्बरने हल्ला केल्याने किमान १० पाकिस्तानीसैनिक जखमी झाले, त्यापैकी तीन गंभीर आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा ताफा मिरालीहून मिरामशाह या जिल्हा मुख्यालयाकडे जात होता, तेव्हा मोटारसायकलवरून आलेल्या एका आत्मघाती हल्लेखोराने एका वाहनाजवळ स्फोट घडवून आणला, असे डॉन न्यूजने म्हटले आहे.मिराली येथील खादी मार्केटजवळ हा हल्ला करण्यात आला. उपायुक्त शाहिद अली खान यांनी ताफ्यावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याला दुजोरा देताना सांगितले की, 10 सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. याआधी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या हल्ल्यात 15 कर्मचारी जखमी झाले आहेत.सूत्रांनी सांगितले की, तीन जवान गंभीर जखमी झाले असून त्यांना बन्नू गॅरिसनमधील लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हल्ल्यानंतर लगेचच सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम सुरू आहे. रहिवाशांनी सांगितले की, मिराली-मिरमशाह रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता आणि आतापर्यंत कोणत्याही गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही, असे डॉनने वृत्त दिले आहे.इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने या घटनेवर कोणतेही वक्तव्य जारी केले नाही. गेल्या महिनाभरात सुरक्षा दलांवर झालेला हा दुसरा आत्मघातकी हल्ला आहे. ३० मे रोजी उत्तर वझिरीस्तानमधील रझमाक भागात मोटारसायकलवरून आलेल्या एका आत्मघाती हल्लेखोराने सुरक्षा दलाच्या ताफ्यावर हल्ला केला होता, त्यात दोन सैनिक आणि दोन मुले जखमी झाली होती.
आत्मघाती बॉम्बस्फोटात 10 पाक सैनिक जखमी, सुरक्षा दलांच्या ताफ्यावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2022 2:44 PM