छत्तीसगढच्या दुर्ग आणि भिलाईमध्ये दोन आत्महत्येच्या घटना समोर आल्या आहेत. दोन्ही तरूणी मागे अनेक रहस्य सोडून गेल्या आहेत. एकीने स्वत:चं जीवन संपण्याआधी आपला स्मार्टफोन फॉर्मॅट केला तर दुसऱ्या विद्यार्थीनीने आपल्या पुस्तकाच्या ५० पानावर 'I Hate My Life' असं लिहिलं आहे. दोन विद्यार्थीनीच्या या कृत्यामुळे सगळे हैराण झाले आहेत.
पहिल्या आत्महत्येची घटना भिलाईच्या खुर्सीपार पोलीस स्टेशन अतंर्गत १६ वर्षीय अल्पवयीन एम चांदनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या या पावलामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्यांना काहीच कळत नाहीये की, मुलीने असं का केलं.
मीडिया रिपोर्टनुसार, या घटनेवेळी मुलीचे आई-वडील ओळखीच्या कुणालातरी भेटण्यासाठी गेले होते. ते घरी आले तेव्हा त्यांना मुलीने गळफास घेतल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांनी येऊ मृतदेह खाली काढला. पोलिसांना घटनास्थळी एक पुस्तक मिळालं असून त्याच्या ५० पानांवर मुलीने इंग्रजीत 'आय हेट माय लाइफ' लिहिलं आहे.
काही पानांवर तिने तरूण-तरूणीसोबत बसल्याचे चित्रही काढले आहे. तर एका पानावर एकट्या बसलेल्या तरूणीचं चित्र आहे. कुटुंबीयांनी सांगितलं की, चांदनीची एका तरूणासोबत मैत्री होती. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.
फॅशन डिझायनर तरूणीची आत्महत्या
दुर्गच्या मोहन नगर पोलीस स्टेशन भागातील शंकर नगरमध्ये राहणाऱ्या २१ वर्षीय सुष्मिता डोंगरे हिने रात्री २ ते सकाळी ६ वाजता दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी कुटुंबीय तिला उठवण्यासाठी गेले तेव्हा तिचा मृतदेह आढळून आला.
पोलिसांना प्राथमिक पाहणीत आढळून आलं की, सुष्मिता फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेत होती लॉकडाऊनमुळे गेल्या एक वर्षापासून ती घरीच आहे. पोलिसांनी तपासात आढळून आलं की, मोबाइल फॉर्मॅट केल्यावर विद्यार्थीनीने आत्महत्या केली. अजून तरूणीच्या आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही.