मुंबई : चेंबूर येथील प्रभाग क्रमांक १५५ चे नगरसेवक श्रीकांत शेट्ये यांच्या मुलाने रविवारी रात्री आत्महत्या केली. मृत अभिषेक शेट्ये (२६) हा रविवारी लालडोंगर परिसरातील श्रमिक इमारतीतील त्याच्या राहत्या घरात एका वेगळ्या खोलीत झोपला होता. रात्री बराच उशीर होऊन देखील तो खोलीबाहेर आला नाही. त्यामुळे त्याचे कुटुंबीय त्याच्या खोलीत पाहायला गेले असता अभिषेकने गळफास घेतल्याचे त्यांना आढळून आले. सुमारे दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने अभिषेक यास तातडीने चेंबूरच्या सुश्रुत रुग्णालयात दाखल केले. परंतु त्याठिकाणी त्याला मृत घोषित करण्यात आले. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
कालच प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतवर मानसोपचार सुरू होते. त्याबद्दलची काही कागदपत्रंदेखील त्याच्या घरात पोलिसांनी सापडली. त्यामुळे नैराश्यातून सुशांतनं टोकाचं पाऊल उचललं असावं, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अलीकडेच नैराश्यामुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण तरुणाईमध्ये वाढले असल्याचे दिसून येत आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
बोहल्यावर चढलेल्या कट्टर नक्षलवादी महिलेस अटक, दोन्ही हाताने चालवते AK-47
अधुरी प्रेम कहानी! GF ला भेटण्यासाठी मध्यरात्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला डॉक्टर; जिवाला मुकला
अनर्थ टळला! दादरमध्ये सुरु होता ४ तास थरार, इमारतीवर चढून पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न