महाबळेश्वर - महाबळेश्वर येथील प्रसिद्ध लिंगमळा धबधब्यावरून दरीत उडीत मारत प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल घडली आहे. काल सायंकाळी त्या दोघांनी हाताची नस कापून दरीत उडी घेतल्याचे समोर आले आहे. नगर जिल्ह्यातील ख्यातनाम महाराष्ट्र केसरी पैलवान अशोकभाऊ शिर्के यांचा मुलगा अविनाश शिर्के याने महाबळेश्वरच्या प्रसिद्ध लिंगमाळा धबधब्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या दोघांचे मृतदेह 400 ते 500 फूट खोल दरीत आढळून आले. घटनास्थळी रक्ताने माखलेला चाकू व आधारकार्ड सापडले आहे.
काल सकाळी एका हॉटेलमधून हे दोघे जण लिंगमाळा धबधबा पाहण्यासाठी टॅक्सीने गेले होते. हे दोघे उशिरापर्यंत परतले नाहीत. त्यामुळे टॅक्सीचालकाने वनविभाग कर्मचार्यांना ही माहिती दिली. वनक्षेत्रपाल रणजित गायकवाड यांनी ट्रेकर्सच्या मदतीने शोध घेतला असता एके ठिकाणी रक्त सांडले होते. तिथेच त्यांना रक्ताने माखलेला चाकू आणि अविनाश अशोक शिर्के याचे आधारकार्ड मिळाले. त्यानंतर खोल दरीत दोघांचेही मृतदेह आढळले.महाबळेश्वर शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध लिंगमळा धबधबा असून काल सकाळी ९ वाजताच्या सुमरास एका हॉटेलमधून हे प्रेमीयुगुल टॅक्सीमधून हा धबधबा पाहण्यासाठी आले होते. मयत अविनाश शिर्केचे वडील अशोक शिर्के हे महाराष्ट्र केसरी, मुंबई महापौर केसरी पैलवान आहेत. ते लष्कराचे पैलवान म्हणून त्यांची ख्याती आहे.