वाशिम (कारंजा) : प्रेमीयुगुलाने शहरापासून १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपरी फॉरेस्ट रामनगर येथील अडाण जलाशयात आत्महत्या केल्याची घटना ४ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. शंकर एकनाथ खिराडे व खुशी लक्ष्मीकांत मेहता अशी आत्महत्या करणाऱ्या प्रेमीयुगुलाची नावे आहेत. ते दोघेही कारंजा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक दोघेही एकमेकांचे शेजारी असून, यातील मुलगी विवाहित आहे, तर मुलगा अविवाहित आहे. दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. मुलीचा सहा महिन्यांपूर्वीच विवाह पार पडला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती माहेरी राहत होती. ३ ऑगस्ट रोजी दोघेही घराबाहेर पडले आणि उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शेाधाशोध केली असता ते आढळून आले नाही. गुरुवारी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान अडाण जलाशयातील विहिरीजवळ त्या दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना स्थानिकांना आढळून आले.