हरयाणाच्या फतेहाबादमध्ये एका तरूणाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. पोस्टमार्टमनंतर तरूणाचा मृतदेह परिवाराकडे सोपवण्यात आलं आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. अशात मृत तरूणाच्या परिवाराने आरोप केला आहे की, त्यांच्या विधवा सूनेच्या परिवाराला कंटाळून त्यांच्या लहान मुलाने मृत्युला जवळ केलं.
असे सांगितले जात आहे की, मृत तरूणावर विधवा वहिनीच्या परिवाराकडून लग्नासाठी दबाव टाकला जात होता. पण तो यासाठी तयार नव्हता. विधवा वहिनीच्या परिवारातील लोक पीडित परिवाराला सतत धमक्या देत होते. ज्यामुळे चिंतेत असलेल्या तरूणाने रेल्वेसमोर येऊन आत्महत्या केली.
मृत तरूणाचे वडील विनोद कुमार म्हणाले की, तीन वर्षाआधी त्यांच्या मोठ्या मुलाचं निधन झालं होतं. नंतर विधवा सूनेच्या परिवारातील लोकांना आमच्या लहान मुलासोबत तिचं लग्न लावून द्यायचं होतं. पण त्यांचा लहान मुलगा या नात्यासाठी अजिबात तयार नव्हता. सूनेच्या परिवाराकडून यासाठी सतत दबाव टाकला जात होता. (हे पण वाचा : पत्नीच्या अफेअरला कंटाळून पतीने स्वत:वर झाडली गोळी, आत्महत्येपूर्वी व्हिडीओ केल शेअर!)
मृत तरूणाच्या वडिलांचा आरोप आहे की, काही दिवसांपूर्वी सूनेच्या एका नातेवाईकांचा फोन आला होता की, जर हे नातं ठरलं नाही तर तो त्याच्या परिवाराविरोधात पोलिसात तक्रार देईल. इतकेच काय तर ते लहान मुलाला खोट्या रेप केसमध्येही फसवतील अशीही त्यांनी धमकी दिली होती. यामुळे माझा लहान मुलगा चिंतेत होता आणि म्हणून त्याने आत्महत्या केली.
रेल्वेच्या जीआरपी पोलीस अधिकारी धर्मपाल सिंह यांनी सांगितले की, ३१ वर्षीय तरूणाचा दिल्लीहून श्रीगंगानगरला जाणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेस ट्रेनखाली येऊन मृत्यू झाला. मृतदेहाजवळ एक मोटारसायकल आणि काही कागदपत्रे मिळाली आहेत. त्यानंतर मृतकाच्या परिवाराला माहिती देण्यात आली.