शिवसेना आमदारप्रताप सरनाईक याना ईडीकडून समन्स बजावण्यात आलेत. टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात त्यांना हा समन्स बजावले आहे. तसेच प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांना ईडीन समन्स बजावला आहे. त्यामुळे प्रताप सरनाईक आणि विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहावे लागणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या गुरुवारी दुपारी चौकशीसाठी हजर राहण्याची माहिती मिळते आहे. ईडीच्या समन्सला सरनाईक पिता पुत्रांनी अद्याप काही उत्तर न दिल्याची माहिती मिळत आहे. आज प्रताप सरनाईक यांचा क्वारटाईनचा कालावधीती संपणार आहे. २५ नोव्हेंबरला प्रताप सरनाईक याच्या घर आणि कार्यालयावर धाड टाकली होती. विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरीही छापे मारले होते. आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक सोमवारी चाैथ्यांदा ईडीच्या चौकशीसाठी गैरहजर राहिले होते. तर दुसरीकडे प्रताप सरनाईक यांचा क्वारंटाइनचा कालावधी संपत असल्याने त्यांनाही पुन्हा ईडीकडून समन्स बजाविण्यात आले आहे.
एमएमआरडीएच्या सुरक्षारक्षक घोटाळ्याप्रकरणी ईडीने अमित चांडोळे याला अटक केली होती. रविवारी न्यायालयाने त्याला ९ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. ईडीने त्याच्या वाढीव कोठडीची मागणी केली होती. मात्र योग्य पुरावे सादर करू न शकल्याने त्याच्या वाढीव कोठडीस न्यायालयाने नकार दिला होता.