असं सांगितलं जातं की, प्रत्येक गुन्हेगार काहीना काही पुरावा सोडून जातो. पण इंदुरमध्ये एका तरूणीच्या हत्येप्रकरणी इंदुर जीआरपीला काहीच पुरावा मिळत नव्हता. अशात जीआरपीने असा प्लॅन केला की, आरोपी स्वत:च पोलिसांकडे आला.
२८ एप्रिल २०२१ ला इंदुरजवळच्या मांगलिया गावातील रेल्वे स्टेशनवर एका तरूणीचा मृतदेह आढळून आला होता. रेल्वे खाली आल्याने तरूणीच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते. पोस्टमार्टमधून समोर आलं की, मृत्यूआधी तरूणीवर रेप करण्यात आला होता. (हे पण वाचा : Shocking! कबरेतून मुलीचा मृतदेह काढून केलं अमानवीय कृत्य, पोलिसांकडून नराधमाचा खेळ खल्लास)
रेल्वेशी संबंधित असल्याने प्रकरणाचा तपास जीआरपी करत होते. जीआरपीला या केसमध्ये काहीच पुरावे सापडत नव्हते. चौकशी दरम्यान केवळ इतकंच समजलं की, ज्या गावाजवळ ही घटना घडली तिथे यूपीच्या ललितपूरमधील काही तरूण भाड्याने राहत होते आणि ते घटनेनंतर फरार होते.
संशयाच्या आधारावर जीआरपीने ललितपूरला जाऊन आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, जीआरपीच्या अधिकाऱ्यांनी एक प्लॅन केला आणि ललितपूरमध्ये अफवा पसरवली की, आरोपी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले. त्यांनी लवकर पोलिसांकडे यावं. त्यानंतर जीआरपी अधिकारी परत इंदुरला परतले.
अफवा ऐकून ललितपूर गावात राहणारा एक अल्पवयीन आरोपी घाबरला. त्यानंतर तो इंदुरला हे बघण्यासाठी आला की, अखेर कोणत्या सीसीटीव्ही कॅमेरात त्याचा फोटो कैद झाला असेल? यानंतर इंदुर जीआरपीला एक खबऱ्याने सूचना दिली की, आरोपी इंदुरला येत आहे. जसा अल्पवयीन आरोपी इंदुरला पोहोचला, जीआरपीने त्याला अटक केली.
रिपोर्टनुसार, चौकशी दरम्यान आरोपीने सांगितलं की, त्याने तरूणीची हत्या केली नाही. ती त्याच्यावर प्रेम करत होती आणि तिला त्याच्यासोबत लग्न करायचं होतं. त्याने लग्नास नकार दिला तिने रागात रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली.