नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशातच एक भयंकर घटना घडली आहे. अंद्धश्रद्धेने एका चिमुकल्याचा बळी घेतला आहे. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बरेलीमध्ये (Bareilly) मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका पाच वर्षाच्या चिमुकल्याला करंट (Electric Shock) लागला होता. मात्र या दुर्घटनेनंतर त्याला रुग्णालयात लगेच न नेता त्याच्यावर घरगुती उपचार करण्याच्या प्रयत्नात त्याचा मृत्यू झाला आहे. करंट लागला म्हणून चिमुकल्याला मातीखाली पुरून ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या बरेलीमधील शिशगड परिसरामध्ये ही दुर्घटना घडली. याठिकाणी ई रिक्षा चालवणारे रिक्षा चालक भूपेंद्र यांची रिक्षा घराबाहेर चार्ज होत होती. त्याचवेळी त्यांचा मुलगा करण हा त्याठिकाणी आला. मोकळ्या तारेशी त्याचा संपर्क आला आणि त्याला करंट लागला. मुलाला जोरात शॉक बसला होता. त्यामुळे त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेणं गरजेचं होतं. मात्र त्याऐवजी कुटुंबीयांनी त्याच्यावर घरगुती उपचार सुरू केले. त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी मातीखाली पुरून ठेवण्यात आलं.
जवळपास एक तास या मुलाला तसंच ठेवण्यात आलं. या दरम्यान मुलाला प्रचंड त्रास होत होता. पण तरीही त्याला तसंच ठेवण्यात आलं. त्यानंतरही त्याचा त्रास कमी झाला नाही म्हणून त्याला रुग्णालयात नेलं जात होतं. मात्र रुग्णालयात जाण्यापूर्वीच त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. एका नातेवाईकाच्या सांगण्यानुसार चिमुकल्याला मातीखाली ठेवण्यात आलं होतं. पण जर वेळीच रुग्णालयात नेलं असतं तर त्याचा जीव वाचवण्यात यश आलं असतं. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
माणुसकीला काळीमा! 10 वर्षीय मुलीवर 7 जणांकडून बलात्कार; मोबाईलवर Video पाहून वडिलांना मोठा धक्का
एका 10 वर्षीय मुलीवर शाळेतील परिसरात 7 जणांकडून बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे यातील 6 मुले ही अल्पवयीन आहेत. आरोपींनी या घटनेचा व्हिडीओ बनवून तो काहींच्या व्हॉट्सॲपवर पाठवला होता. व्हायरल झालेला तो व्हिडीओ मुलीच्या वडिलांना देखील मिळाला. हे पाहून त्यांना खूप मोठा धक्काच बसला आणि त्यानंतर हा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.