नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील घोसी लोकसभा मतदारसंघातून विजय झालेले बसपाचे खासदार नवनिर्वाचित खासदार अतुल राय यांचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे. नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल संबंध भारताचा जाहीर झाला. या निवडणुकीत उत्तर प्रदेशातील घोसी लोकसभा मतदारसंघातून बसपाचे अतुल राय खासदार म्हणून विजयी झाले आहेत. बसपाचे नवनिर्वाचित खासदार अतुल राय यांच्यावर एका विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याचा गुन्हा आहे. संबंधित पीडित मुलीने तक्रार दाखल केल्यानंतर सत्र न्यायालयाने त्यांच्या अटकेचे आदेश दिले होते. या आदेशानंतर अतुल राय फरार आहेत. या नवनिर्वाचित खासदाराला सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला आहे. बलात्काराच्या आरोपाखाली अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी करणारी याचिका न्यायालायने फेटाळून लावली आहे. त्यामुळे खासदार तुरुंगाची जाण्याची शक्यता आहे.
राय यांनी न्यायालयाकडे 23 मेपर्यंत दिलासा देण्याची विनंती केली होती. मात्र, न्यायालयाने ती विनंती फेटाळली होती. न्या. इंदिरा बॅनर्जी आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने हे प्रकरण रद्द करण्यासारखे नाही. तुम्ही निवडणूक देखील लढवली आहे आणि तुमच्यावर खटला देखील सुरु आहे. राय यांची याचिका रद्द केली असून याप्रकरणी सोमवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. पत्नीची भेट करुन देते असे सांगत अतुल राय यांनी पीडित तरुणीला घरी बोलवले होते. त्यानंतर त्यांनी तिच्यावर अत्याचार केला होता. यासंदर्भात राय यांनी तरुणीला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. दरम्यान, अतुल राय यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. संबंधित तरुणी निवडणूक लढवण्यासाठी कार्यालयात निधी मागण्यासाठी येत असे. तसेच निवडणुकीच्या काळात ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.