सदानंद नाईक
उल्हासनगर : कल्पतरू को ऑफ क्रेडिट सोसायटीच्या चेअरमन अमित वाधवा यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला जिवेठार मारण्याची धमकी अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारी यांनी देऊन १ कोटींची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास एका चौघाडीने सोसायटी कडून घेतलेले कर्ज व व्याजाचे हप्ते परत मागण्यास मनाई करण्यात आली. याप्रकरणी सुरेश पुजारीसह ५ जनावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगरातील व्यावसायिक अमित वाधवा हे कल्पतरू कॉ ऑफ क्रेडिट सोसायटीचे चेअरमन आहेत. कल्पतरू सोसायटीकडून रोशन माखिजा, उमेश राजपाल, पंकज त्रिलोकांनी व सुनील उदासी यांनी कर्ज घेतली असून कर्ज व त्यावरील व्याजाचे हप्ते बुडविण्याच्या उद्देशाने त्यांनी अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारी यांच्या सोबत संगनमत केले. असे तक्रारीत म्हटले. अमित वाधवा यांच्या वेगवेगळ्या मोबाईल नंबरवर जानेवारी ते ८ एप्रिल २०२१ दरम्यान सुरेश पुजारी याने फोन कॉल करून कुटुंबासह जिवेठार मारण्याची धमकी दिली. तसेच १ कोटींची खंडणी मागितली. खंडणी दिली नाहीतर, कल्पतरू कॉ ऑफ क्रेडिट सोसायटी कडून रोशन माखिजा, पंकज त्रिलोकांनी, उमेश रामपाल व सुनील उदासी यांनी घेतलेले कर्ज व त्यावरील व्याज मागण्यास मनाई केली. याप्रकाराने अमित वाधवा यांच्यासह कुटुंबाला धक्का बसला.
१ कोटीच्या खंडणीने घाबरलेल्या अमित वाधवा यांनी थेट उल्हासनगर पोलीस ठाणे गाठून लेखी तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारी यांच्यासह पंकज त्रिलोखानी, रोशन माखिजा , उमेश रामपाल व सुनील उदासी यांच्या विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकाराने सुरेश पुजारी शहरात पुन्हा सक्रिय झाल्याचे बोलले जाते. यापूर्वी त्याने शहरातील अनेक नामांकिताना खंडणीसाठी फोन करून, एका केबल व्यावसायिकाचा भर दिवस शॉपशूटर करावी खून करून दहशद माजविण्याचा प्रयत्न केला होता. तसेच अनेकांच्या कार्यालय व दुकानावर शॉपसुटर करवी फायरिंग केली. पोलिसांनी वेळीच सतर्क होऊन कारवाई करण्याची मागणी शहरातून होत आहे.