शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

आठ लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षली दांपत्याचे आत्मसमर्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 6:52 PM

Naxalist Surrender : विविध गुन्हे; कोरची व टिपागड दलममध्ये होते कार्यरत

गडचिरोली : नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह सुरू असताना त्यांना हादरा देत एका नक्षली दांपत्याने शुक्रवारी (दि.३०) चळवळ सोडून पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. या दांपत्यापैकी पतीवर ६ लाखांचे, तर पत्नीवर दोन लाखांचे बक्षीस शासनाने ठेवले होते. यावर्षी (२०२१) आतापर्यंत सहा नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. विनोद उर्फ मनीराम नरसू बोगा (३२ वर्ष, रा. बोटेझरी, ता. कोरची, जि. गडचिरोली) आणि कविता उर्फ सत्तो हरिसिंग कोवाची (३३ वर्ष, रा.गौडपाल, जिल्हा राजनांदगाव (छत्तीसगड) अशी या दांपत्याची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले, नक्षल चळवळीत असतानाच या दोघांनी विवाह केला. विनोद हा कोरची दलममध्ये एसीएम (एरिया कमिटी मेंबर) म्हणून, तर कविता ही पार्टी मेंबर म्हणून टिपागड दलममध्ये कार्यरत होती. त्यांच्या आत्मसमर्पणासाठी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात धानोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

जिल्हा पोलीस दलाने नक्षलविरोधी अभियान प्रभावीपणे राबविल्यामुळे २०१९ ते २०२१ या अडीच वर्षांत ४३ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामध्ये ४ डीव्हीसी, २ दलम कमांडर, ३ उपकमांडर अशा वरिष्ठ कॅडरसह ३३ सदस्य आणि १ जनमिलीशियाचा समावेश आहे. पत्र परिषदेला अपर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया (अभियान), समीर शेख (प्रशासन) सोमय मुंडे (अहेरी उपमुख्यालय) आणि एसडीपीओ भाऊसाहेब ढोले (अभियान) उपस्थित होते.

विनोद बोगावर खुनाचे १३ गुन्हे

आत्मसमर्पित नक्षली विनोद बोगा याच्यावर खुनाचे १३ गुन्हे, चकमकीचे २१, जाळपोळीचा एक आणि इतर ५ गुन्हे दाखल आहेत. कवितावर चकमकीचे ५, जाळपोळीचा १ आणि इतर ३ गुन्हे दाखल आहेत. शासनाच्या योजनेनुसार नक्षली पती-पत्नीने एकाचवेळी आत्मसमर्पण केल्यास त्यांना दीड लाख रुपये अतिरिक्त लाभ दिला जातो. तो लाभ या दांपत्याला मिळेल.

टॅग्स :PoliceपोलिसGadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादीFiringगोळीबार