झारखंड - कुंदन पाहन या नक्षवाद्यांच्या म्होरक्याने २०१७ साली आत्मसमर्पण केले होते. कुंदनला एआयए कोर्टाने झारखंडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास परवानगी दिली आहे. कुंदनचे वकील ईश्वर दयाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणि निवडणूक लढविण्यासाठी विशेष एनआयए कोर्टाकडून परवानगी मागितली होती. एनआयए कोर्टाने कुंदनला 15 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास परवानगी दिली असल्याची माहिती दयाळ यांनी दिली आहे.
२०१७ साली कुख्यात नक्षलवादी कुंदन पाहनने रांची पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. कुंदनने वरिष्ठ पोलीस अधिकारी फ्रांसिस इंदवार यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह एनएच ३३ रस्त्यावर फेकून दिला होता. त्यानंतर त्याच्यावर १५ लाखांचे बक्षिस घोषित करण्यात आले होते. १७ वर्षांपूर्वी नक्षलवादी बनलेल्या कुंदनवर आमदार, खासदार, पोलीस अधिकाऱ्यांच्या हत्येसह एकूण १२८ प्रकारच्या गुन्ह्यांची झारखंडमधील वेगवेगळ्या पोलीस स्थानकांत नोंद आहे. कुंदनने अतिरीक्त पोलिस महासंचालक आर.के. मलिक यांच्यासमक्ष आत्मसमर्पण केले होत.का केले होते आत्मसमर्पण?
कुंदन नक्षलवादी असला तरी त्याने मुलीला मात्र सर्वात महागड्या कॉन्व्हेंट शाळेत टाकले आहे. रांचीच्या एका बड्या शाळेत त्याची मुलगी शिकते. मुलीच्या प्रेमापोटीच त्याने पोलिसांसमोर शरणागती पत्करल्याचे सांगण्यात येते. याशिवाय त्याला राजकारणातही यायचे आहे. तुरूंगातून बाहेर पडल्यानंतर तो झारखंड मुक्ती मोर्चात सामिल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.