मुंबई - सुशांत सिंग रजपूत आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारची व मुंबईपोलिसांची बदनामी करणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या वादावर आज पडदा पडला आहे. एम्स हॉस्पिटलने सुशांतने आत्महत्याच केली असे शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे सुशांत प्रकरणावरून मुंबई पोलिसांवर आणि महाविकास आघाडी सरकारवर आरोप करणारे आता तोंडघशी पडले आहेत. बिहारची निवडणूक नजरेसमोर ठेवून हा मुद्दा रंगवण्याचा अत्यंत गलिच्छ प्रकार भाजपाच्या प्रवक्त्यांनी केला होता. बिहार पोलिसांनीही सुशांतची हत्या झाल्याचा दावा केला होता त्यामध्ये दावा करणारे बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे आता राजकारणात उतरले आहेत.