मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येमागे अनेक प्रकारच्या मानसिक समस्या असू शकतात. त्यात नैराश्य, अपयश, चिंता, नकारात्मकता, भूतकाळात गमावलेली माणसे, त्यांची पोकळी अशा अनेक कारणांचा समावेश आहे. त्याला निद्रानाश, चिंता, भूक न लागणे अशी लक्षणे होती. अपेक्षेप्रमाणे काही घडत नसल्याने त्याला असुरक्षित वाटत होते, असा खुलासा त्याच्यावर उपचार करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञांनी सीबीआयंसमोर केल्याचे समजते.सुशांतच्या आत्महत्येमागील कारणांचा, तसेच सुशांतने खरंच आत्महत्या केली की त्यामागे काही घातपात होता, याचा तपास सीबीआय करत आहे. मानसोपचार तज्ज्ञांकडे केलेल्या चौकशीतून या बाबी समोर आल्या आहेत.आपल्या आजारामुळे कुटुंबियांना त्रास होईल, अशी सुशांतची भावना होती. सुशांतच्या प्रकृतीविषयी कळविण्यासाठी सातत्याने अभिनेत्री रिया चक्रवर्ती संपर्कात असल्याचेही डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. एका मानसोपचार तज्ज्ञाने दिलेल्या माहितीनुसार, आठ जून रोजी रियाने सुशांतचे घर सोडले, त्यावेळेस त्याची बहिण मितू सिंग तिथे राहायला आली. त्यावेळी रियाने सुशांतच्या प्रकृतीविषयी मेसेज करून तो नैराश्यग्रस्त असल्याचे कळवत प्रिस्क्रि प्शन पाठवून औषधे घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र सुशांतने ते अमान्य केले आणि रियाच्या फोनवरु न व्हिडीओ कॉलद्वारे डॉक्टरांशी संपर्क केला होता. डॉक्टरांनी औषधे घेणे थांबविल्याविषयी सुशांतला कॉलवर विचारले असता त्याने स्पष्ट सांगण्यास नकार दर्शविला.औषध घेणे थांबविले होतेसुशांत पहिल्यांदा नोव्हेंबर २0१९ मध्ये उपचारांसाठी आला होता. त्यावेळी तपासणीदरम्यान तो नैराश्यावस्थेत असल्याचे निदान झाले. मात्र सुशांतने औषध घेणे थांबविल्याने उपचारांमध्ये अडथळे निर्माण होत होते, असा खुलासाही मानसोपचार तज्ज्ञांनी केला आहे.
सुशांतची आत्महत्या मानसिक समस्येतून - मानसोपचार तज्ज्ञ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 6:40 AM