शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

सुशांत राजपूत: आदित्य ठाकरेंवर कथित आरोप; दिल्लीच्या वकिलाला ठोकल्या बेड्या

By हेमंत बावकर | Published: October 17, 2020 12:20 PM

Sushant singh Rajput, Disha Salian Case: आनंदने कथितरित्या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा सुशांत आणि दिशाच्या मृत्यूशी संबंध जोडणाऱ्या वक्तव्याचा व्हिडीओ यूट्यूबवर पोस्ट केला होता.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि त्याची माजी मॅनेजर दिशा सालियान यांच्या मृत्यूबाबत खोट्या बातम्या पसरविणाऱ्या एका वकिलाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने थेट दिल्लीचा वकील विभोर आनंद याला ताब्यात घेतले आहे. आनंद वकील असल्याचा दावा करत आहे. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी युवासेना नेते आदित्य ठाकरे  (aditya thackeray) आणि अन्य बाबतीत वादग्रस्त पोस्ट, व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याचे त्याच्यावर आरोप आहेत. आनंदचे ट्विटर अकाऊंटही सस्पेंड केले आहे.

 आनंदने कथितरित्या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा सुशांत आणि दिशाच्या मृत्यूशी संबंध जोडणाऱ्या वक्तव्याचा व्हिडीओ यूट्यूबवर पोस्ट केला होता. आनंदच्या या व्हिडीओमध्ये दिशा सालियानची हत्या होण्याआधी तिच्यावर सामुहिक बलात्कार झाल्याचा दावा केला होता. आनंदने या प्रकरणी बॉलिवूडचे अनेक लोक आणि महाराष्ट्रातील एका नेत्याचे नाव घेतले होते. 

9 जूनला झालेला दिशाचा मृत्यूपोलिसांनी केलेली कारवाई ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खोट्या बातम्या पसरविणे आणि विद्वेशक पोस्ट करणे यावर असल्याचे सांगितले जात आहे. दिशा सालियनने मुंबईतील मालाडच्या एका इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. या ईमारतीमध्ये तिचा होणारा नवरा राहत होता. 

19 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीपोलिसांनी सांगितल्यानुसार शहर न्यायालयाकडून इशारा दिल्यानंतरही विभेर आनंद (31) सतत सोशल मीडियावर खोटे आणि वाटेलतसे पोस्ट लिहत होता. तसेच यामध्ये अनेक व्यक्तींवर गंभीर आरोप करत होता. पोलिसांनी त्याला दिल्लीतील राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. गुरुवारी रात्री उशिरा त्याला मुंबईत आणण्यात आले. विभोरला 19 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आनंदच्या वकिलाने सांगितले की, पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा हा राजकारणातून प्रेरित आहे. माझ्या अशिलाने केवळ त्याचे विचार व्यक्त केले होते. बॉम्बे सिव्हील कोर्टाने वादग्रस्त पोस्ट हटविण्याचा आदेश दिला होता. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याRapeबलात्कारMumbai policeमुंबई पोलीस