मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणातील प्रमुख संशयित, सुशांतची मैत्रीण, अभिनेत्री रिया चक्रवर्तीभोवती आता ईडी, सीबीआयबरोबरच केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण पथकाने (एसीबी) चौैकशीचा फास आवळला आहे.
ड्रगच्या सेवनाबाबत तिच्या व्हॉट्सअॅप चॅटवरून मिळालेल्या माहितीच्या आधारे एनसीबीचे पथक लवकरच तिची चौकशी करणार आहे. दरम्यान, सीबीआयचे पथकही तिला कोणत्याही क्षणी चौकशीसाठी ताब्यात घेऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.वांद्रे पोलिसांची चौकशीगेल्या सहा दिवसांपासून या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या सीबीआयने बुधवारी वांद्रे पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी भूषण बेळणकर, उपनिरीक्षक वैभव जगताप यांच्याकडे तसेच सुशांतचा नोकर नीरज सिंग आणि त्याच्या फ्लॅटच्या सुरक्षारक्षकांकडे चौकशी केली. डीआरओच्या गेस्ट हाउसमध्ये त्यांची सुमारे पाच तास सखोल चौकशी करण्यात आली. बेळणकर व जगताप यांनी आतापर्यंत केलेला तपास तसेच ५६ जणांच्या नोंदविलेल्या जबाबाबाबत त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली. त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलाविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.भाड्यासाठी केले कॉल - संदीप सिंहसुशांतचा मित्र आणि दिग्दर्शक संदीप सिंह याचीही चौकशी केली जाणार असल्याचे समजते. १४ ते १६ जूनपर्यंत तो सुशांतचे शव नेणाऱ्या शववाहिका चालकाच्या संपर्कात होता. त्याने त्याला सहा वेळा कॉल केल्याचे समोर आले आहे. आपण शववाहिका चालकाला भाडे देण्यासाठी कॉल केले, असे त्याने सांगितले.
रियाच्या मोबाइलमधील चॅट तपासले असता तिने ड्रग पेडलर जया सहाबरोबर सुशांतला किती ड्रग्ज द्यायचे यासंदर्भात विचारल्याचे समोर आले आहे. याच्या अनुषंगाने ईडीने तिची चौकशी करावी यासंदर्भात एनसीबीला पत्र दिले होते. त्यानुसार एनसीबीने तिच्या चौकशीचा निर्णय घेतल्याचे या विभागाचे संचालक राकेश अस्थाना यांनी सांगितले.