नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येचा तपास अखेर सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे. बिहार सरकारची मागणी मान्य करण्यात आली असून यापुढे या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचे केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे.
केंद्र सरकारचे वकील तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, बिहार सरकारची मागणी मान्य करण्यात आली असून ही केस सीबीआयकडे वर्ग करण्यात आली आहे. तर रियाचे वकील श्याम दिवान यांनी सांगितले की, मेहता यांनी जे काही सांगितले तो या सुनावणीचा विषय नाहीय. न्यायालयाने याचिकेवर लक्ष घालावे. रियाने या सर्व चौकशी प्रकरणावर स्थगिती आणण्याची मागणी केली आहे. बिहारमध्ये नोंदवलेला एफआयआर हा कायद्यानुसार नाहीय. यामुळे न्यायालयाने हे रोखावे, अशी मागणी दिवान यांनी केली आहे.
बिहार पोलीस मुंबईला गेले आणि स्वत: चौकशी करायला लागले. त्यांच्या अधिकार क्षेत्रात ही बाब येत नाही. मुंबई पोलीस आधीपासून चौकशी करत आहेत. रियाविरोधात पाटण्यामध्ये दाखल झालेला गुन्हा मुंबईला हलवावा. मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 59 जणांचे जबाब नोंदविले आहेत, असे दिवान यांनी सांगितले.
यावर न्यायमूर्ती ऋषिकेश राय यांनी सांगितले की, सुशांत हुशार आणि गुणवत्तेचा कलाकार होता. त्याचा रहस्यमयी मृत्यू धक्का देणारा आहे. हा तपासाचा विषय आहे. जेव्हा कोणत्या हाय प्रोफाईल खासकरून बॉलिवूडच्या कलाकाराचा मृत्यू होतो तेव्हा प्रत्येकाचा वेगळा दृष्टीकोण असतो. सीबीआय चौकशीबाबत महाराष्ट्र सरकारने उत्तर द्यावे. आम्ही ठरवू की या प्रकरणी कोण तपास करेल.
तर सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी सांगितले की, मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना सहकार्य करावे. यासाठी सूचना देण्याची मागणी केली. रियाच्या मागणीला आमचा विरोध आहे. रियाला या प्रकरणी कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळू नये, असेही त्यांनी न्यायालयात सांगितले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
Xiaomi ला सरकारचा जोरदार दणका; मोबाईलमधील ब्राऊझर बॅन केला
राजकारण बाजुला ठेवा, वडिलांना हे विचारा! आदित्य ठाकरेंवर कंगनाचा प्रश्नांचा भडीमार
लक्झरी कार 'Porsch 911' घेण्यासाठी पठ्ठ्याने असे काही केले; थेट जेलमध्ये रवानगी झाली
आजचे राशीभविष्य - 5 ऑगस्ट 2020; कर्क, सिंह राशींसाठी आज क्लेशाचा दिवस, सांभाळा
दोन दिवसांपूर्वीच कोरोनावर मात; माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुण्यात निधन
शाओमीचा स्वस्तातला Redmi 9A स्मार्टफोन येणार; 6000 पेक्षा कमी किंमत असणार
पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचा मुलगा IAS बनला; वाचा प्रदीप सिंह यांची संघर्षमय कहानी
यंदा LIC चा आयपीओ मालामाल करणार; या कंपन्या करणार शेअर बाजारात एन्ट्री