मुंबई : अभिनेत्री सुशांत सिंग राजपूत हिची बहीण मितू सिंग हिची सोमवारी सीबीआयच्या पथकाने चौकशी केली. त्याचे कुटूंबियाशी असलेले संबंध आणि तिचे 8 ते 12 जून या कालावधीतील वास्तवाबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
तिची दुसरी बहिण प्रियंका आणि तिचे पतीकडे चौकशी केली जाणार आहे. रिया आणि इतरांनी दिलेल्या जबाबाची पडताळणी त्याच्याकडून केली जाणार आहेत. सुशांतच्या मृत्यूचे वेगवेगळे कंगोरे तपासात समोर येत आहेत. सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी ,त्याचे मॅनेजर, नोकर, आणि रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक यांच्याकडे कसून चौकशी केली आहे. त्यांच्यामध्ये काहीशी विसंगती असलीतरी सर्वजण सुशांतने आत्महत्या केली, याबद्दल ठाम आहेत, तसेच सुशांतचे घरच्या मंडळीशी फारसे चांगले संबंध नव्हते, असे सांगितले आहे. तपास पथकाने आज मितूकडे त्याबाबत तिच्याकडे विचारणा केली. त्याचप्रमाणे 14 जूनला सिद्धार्थ पिठानी याने तिला केलेले कॉल, घरी आल्यानंतरची परिस्थितीबाबत माहिती जाणून घेतली.
तसेच सुशांतच्या मानसिक आजाराची कल्पना त्याच्या घरच्यांना होती, असे त्याचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडा याच्या मोबाईल तपासण्यातून स्पष्ट झाले आहे. त्याने सुशांत डिप्रेशनसाठी जी औषधे घेत होता, त्याची प्रिस्किपशन मॅनेजरने मितू आणि प्रियांका यांना पाठविले होते, त्याबाबत अधिकाऱ्यांनी तिच्याकडे विचारणा करण्यात आली. घटनेची सत्यता जाणून घेण्यासाठी रिया आणि संबंधित साक्षीदाराना समोरासमोर बसवून चौकशी केली जाईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला
अनंत चतुर्दशीसाठी मुंबई पोलीस सज्ज, ३५ हजार पोलिसांचा फ़ौजफाटा तैनात
सुशांत आत्महत्येच्या तपासातील पोलीस अधिकाऱ्याला कोरोना; CBI पथकाचीही होणार टेस्ट
संदीप सिंहच्या चौकशीसाठी आलेल्या तक्रारी सीबीआयकडे पाठवणार, अनिल देशमुखांनी दिली माहिती
जंगलात आढळला शिर नसलेला अल्पवयीन मुलीचा मृतदेह, बलात्कार करून हत्या केल्याची शक्यता
Coronavirus : सहा दिवसांत दुसरा पोलीस ठरला कोरोनाचा बळी; गमावले तीन योद्धे