नवी दिल्ली - बॉलिवूडमध्ये किती प्रमाणात ड्रग्ज वापरले जातात किंवा अभिनेता-अभिनेत्री कोणत्या मर्यादेपर्यंत ड्रग्जच्या विळख्यात अडकले आहेत. याविषयी नवे खुलासे आजकाल केले जात आहेत. सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूवर ड्रग अँगल समोर आला. अनेक ड्रग्ज चॅट उघडकीस आले, ज्यामुळे बरेच मोठे खुलासे झाले आहेत. त्यामुळेच अभिनेत्री आणि सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीला तुरुंगात जावे लागले. आता नवीन ड्रग चॅट्स समोर आले आहेत, ज्यामुळे बॉलिवूडमधील अनेक स्टार अडचणीत येऊ शकतात.बॉलिवूड सेलिब्रिटी ज्यांची नावे नवीन ड्रग चॅटमध्ये S, N, D, K ने सुरू होतात. ते सर्व ड्रग्सबाबत व्हॉट्स अॅपवर चॅट करतात. एका अभिनेत्रीचे नाव एन (N) पासून सुरू होते, तर दुसर्या अभिनेत्रीचे नाव के (K) पासून सुरु होतं. या चॅटमध्ये N ने J ला सांगितले आहे की, मला चांगले एमडी द्या. D ने K ला विचारले की, तुमच्याकडे 'माल' आहे का? K ने उत्तर दिले की, पण मी घरी आहे. मी वांद्रे येथे आहे. या नवीन व्हॉट्स अॅप चॅटमधून बॉलिवूडच्या ५ टॉप सेलिब्रिटींची नावे समोर येत आहेत. K, D, S, N हे सर्व ए-यादीतील कलाकार आहेत.
सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्ज अँगलने चौकशी करणार्या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) सोमवारी सुशांतची माजी व्यवस्थापक श्रुती मोदी आणि टॅलेंट मॅनेजर जया साहा यांना चौकशीसाठी बोलावले. यांच्या चौकशीतून बॉलिवूडमधील ड्रग्जच्या अनेक बाबी उघडकीस येऊ शकतात. जया साहा यांच्या फोनवरून मिळालेल्या माहितीवरून असे दिसून आले आहे की, बॉलिवूड स्टार्स त्यांना CBD तेल आणि ड्रग्ज पुरवण्यास सांगायचे. जया साहाच्या व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी सहभागी आहेत. रिया चक्रवर्तीनंतर जया साहा ही बी-टाउन कार्टेलचा एक महत्त्वाचा दुवा आहे. जया प्रसिद्ध सेलिब्रिटींसाठी CBD तेलाची व्यवस्था करीत असे, त्याबाबत एनसीबीला स्त्रोत जाणून घ्यायचा आहे. एजन्सी जया साहाला SLB आणि अमितच्या नावाबद्दलही प्रश्न विचारत आहे, ज्याचा चॅटमध्ये उल्लेख आहेत, अशी माहिती टाईम्स नाऊने दिली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच
Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा
करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार
गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल
महिलेला जबरदस्तीने दारू पाजली अन् उसाच्या मळ्यात केला सामूहिक बलात्कार
मासे खायला दिले नाहीत म्हणून पुतण्यांनी काकाला बेदम मारलं; मारहाणीत झाला मृत्यू
अनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ?, पायल ओशिवरा पोलीस ठाण्यात करू शकते तक्रार दाखल
एटीएम फोडण्याचा डाव् उधळला, चार अल्पवयीन मुले ताब्यात
सुशांतच्या मृत्यूचे गूढ उकलण्याची शक्यता, सीबीआय आणि एम्सच्या टीमची उद्या महत्वपूर्ण बैठक
फेलिक्स दहाल हत्या प्रकरण सीबीआयकडेही प्रलंबितच, आईकडून चिंता व्यक्त