मुंबई - अंमली पदार्थची तस्करी व विक्री करणाऱ्या तस्कराविरुद्ध एनसीबीने कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. गेल्या दोन दिवसात गोवा व मुंबईतून पाचजणांना अटक केली असून त्यांच्याकडून लाखो रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे. या तस्करांचे बॉलिवूड कनेक्शन असल्याचे सांगितले जात आहे. गौरव आर्या आणि रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शोविक हे त्याच्या संपर्कात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. कपिल झव्हेरी, अब्बास लखानी , फेयाज अहमद, परवेझ खान उर्फ चिकू पठाण, बासित परिहार, झेंद विलात्रा व करण अरोरा अशी अटक केल्याची नावे आहेत. झव्हेरी व अब्बास यांना मंगळवारी पश्चिम उपनगरातील अड्डयावर छापे टाकून अटक केली. त्यानंतर बुधवारी इतरांना अटक करण्यात आली. हे सर्वजण बॉलिवूड आणि पेज र्थी पार्ट्यामध्ये अंमली पदार्थ पुरवित असल्याचा अधिकाऱ्यांचा कयास आहे.गौरव आर्या हा बासित परिहार याच्या संपर्कात होता. तो टॅक्सी ड्रायवरचे काम करतो, इच्छुक ठिकाणी त्याचबरोबर मालाची डिलिव्हरी करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविली जात होती. रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शोविक हा ही या तस्कराच्या संपर्कात होता. त्याने एकाकडे वडिलांसाठी अंमली पदार्थाची मागणी केल्याचे व्हॉटस अप मेसेज समोर आले आहेत. त्यानुषंगाने त्याची, गौरव आर्या, रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजित यांच्याकडे एनसीबी चौकशी करणार आहे. त्यचबरोबर ड्रग तस्कराकडून पदार्थाची खरेदी करणाऱ्याकडे बालीवूडमधील 20 जणाची नावे समोर आली आहेत. त्याच्याकडे लवकरच चौकशी केली जाणार आहे.
सुशांतच्या कुटूंबियांना त्याच्या आजाराबद्दल माहितीसुशांत हा डिप्रेशनमध्ये होता, त्याच्यावर ओषधोपचार घेण्यात येत होते, याबद्दल त्याच्या वडिलांबरोबरच बहिणीना कल्पना होती, ही बाब मोबाईलवरील चॅटवरून स्पष्ट झाली आहे. सुशांत आणि तिची बहिण प्रियंका यांच्यातील चॅट समोर आले आहे. तो झोपेच्या गोळ्या घेत होता त्याबद्दल तिने प्रिस्किप्शन पाठविल्याचे स्पष्ट झाले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार
सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला
Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा
आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनला ईडीने केली अटक
आईने व्हर्जिन मुलीसोबत शरीरसंबंधासाठी लावली बोली आणि केला इतक्या लाखांचा सौदा